एम सी आर

महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिव पदी शिवा कांबळे यांची निवड

Uncategorized

नांदेड : दि.
नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद हायस्कूल, मालेगाव ता. अर्धापूर येथील उपक्रमशील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे यांची महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिव पदी नुकतेच निवड झाल्याचा शासन निर्णय सहा मार्च रोजी प्रसिद्ध झाला आहे.
शिवा कांबळे हे गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन झाल्यापासून ते आज पर्यंत या समितीमध्ये कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांच्या कार्यकाळात अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरी, कथा, शाहिरी, लोकनाट्य, प्रवासवर्णन आदी साहित्याचे सात खंड प्रकाशित झाले असून हे खंड प्रकाशित करण्यात शिवा कांबळे यांचे मोठे योगदान राहिले आहे.
शिवा कांबळे यांचे प्रतिभेचा हिमालय : अण्णा भाऊ साठे, राष्ट्राच्या उद्धरणी, जे देशासाठी लढले आदी साहित्य प्रकाशित असून महाराष्ट्रातील अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या चिंतनशील अभ्यासकांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देणा-या अण्णाभाऊंच्या साहित्याचे वारसदार हया महत्वपूर्ण ग्रंथाचे संपादनही प्रकाशनासाठी सिद्ध होत आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे अध्यक्ष उच्च शिक्षण मंत्री तर उपाध्यक्ष उच्च शिक्षण राज्यमंत्री आहेत‌.तर सदस्य म्हणून उच्च शिक्षण विभागाचे मुख्य सचिव, प्रधान सचिव, उच्च शिक्षण विभागाचे संचालक, शासकीय मुद्रणालये व प्रकाशनचे संचालक, यांच्यासह डॉ. सुनील भडंगे, डॉ.देविदास वायदंडे, डॉ. धनंजय भिसे, डॉ. सुधाकर बोकेफोडे, डॉ. उज्वलाताई मोरे, चंद्रकांत केंगारे, ऋषिकेश सकनुर, प्रा.संजय गायकवाड,श्रीम. योगिता साळवी, गणेश भगत,डॉ. पांडुरंग एवळे, सचिन साठे, डॉ.राजेंद्र नाईकवाडे, डॉ.बी. एन. गायकवाड, डॉ .माधव गादेकर,सुरेश पाटोळे, सोपान खुडे, डॉ .प्रमोद गारोडे, सौ. रुपाली अवचरे, राजू बाविस्कर, डॉ .संपत जाधव या समितीत सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
या समितीच्या सदस्य सचिव पदी निवड झाल्याबद्दल शिवा कांबळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share

Related posts

प्राणीशास्त्र हे जैवविविधता आणि पर्यावरणाचा भक्कम पाया – डॉ. रणजितसिंग निंबाळकर

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

Chief Editor

छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त *एम.डी.हॉस्पिटल,नांदेड* येथे *मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर

Chief Editor

स्वा. रा. ती. म. विद्यापीठाचा संघ राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी रवाना

Chief Editor

यशवंत ‘मधील एनसीसी कॅडेट्सचे खडतर प्रशिक्षण यशस्वी

Chief Editor

विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी अनुभवला तिबेटियन सिनेमा ‘द कप’* माध्यमशास्त्र संकुलाच्या कॅम्पस फिल्म क्लबचा उपक्रम

Chief Editor

Leave a Comment