एम सी आर

नांदेड महापौर चषक स्पर्धांचे आयोजन व क्रीडा शिष्यवृत्ती योजनेसाठी महापौरांना निवेदन

Uncategorized

नांदेड, दि. ११ ऑगस्ट २०२६ : ऑलिम्पिक असोसिएशन, नांदेडच्या वतीने नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. कविता संतोष मुळे यांची भेट घेऊन शहरात “महापौर चषक” विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन तसेच राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याबाबत सविस्तर निवेदन ऑलम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष बालाजी पाटील जोगदंड व कोषाध्यक्ष प्रा जयपाल रेड्डी यांच्यावतीने सादर करण्यात आले.
यावेळी महापौर सौ. कविता मुळे यांनी नांदेड शहरातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी महापौर चषक स्पर्धांचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले. तसेच या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी रु. १० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
याशिवाय नांदेड जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना महानगरपालिकेमार्फत क्रीडा शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याच्या मागणीवरही सकारात्मक चर्चा झाली. या योजनेमुळे होतकरू खेळाडूंना आर्थिक बळ मिळून त्यांच्या क्रीडा कारकिर्दीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
बैठकीत नांदेड शहरातील विविध खेळांना प्रोत्साहन देणे, खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नवोदित खेळाडूंना संधी निर्माण करणे आणि नांदेडची क्रीडा परंपरा अधिक समृद्ध करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
या प्रसंगी माझी उपमहापौर नगरसेवक उमेश अण्णा पवळे, नगरसेविका मिनलताई पाटील, ऑलिम्पिक असोसिएशन, नांदेडचे उपाध्यक्ष बालाजी पाटील जोगदंड तसेच कोषाध्यक्ष प्रा. जयपाल रेड्डी उपस्थित होते.
ऑलिम्पिक असोसिएशन, नांदेडने महापौर व महानगरपालिकेचे सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार मानले असून, या निर्णयामुळे नांदेड जिल्ह्यातील खेळाडूंना नवे व्यासपीठ, प्रोत्साहन आणि क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

Share

Related posts

दृश्यम : द कन्क्लुजन’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; विजय साळगावकर पुन्हा अडचणीत!

Chief Editor

महिलांचे राजकारणातील कर्तृत्व वाखाणण्यासारखे -डॉ.लक्ष्मी पूरणशेट्टीवार

Chief Editor

संत शिरोमणी गोरोबा काकांच्या ७५९ व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये २ ऑगस्टला भव्य शोभायात्रा, विद्यार्थी गुणगौरव आणि समाजभूषण सत्कार सोहळा

Chief Editor

पत्रकारांच्या प्रश्नांसाठीचा लढा आणखी तीव्र करणार : संदीप काळे

Chief Editor

कोल्हा येथे पोलीस व सैन्य दलात निवड झालेल्या युवकांचा गौरवपूर्ण सत्कार

Chief Editor

भारतीय गायन क्षेत्रातील तेजस्वी तारा…आशा भोसले*

Chief Editor

Leave a Comment