एम सी आर
Uncategorized

यशवंत ‘ मध्ये कालवश राधाबाई पिराजी वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

नांदेड दि.२१ एप्रिल २०२६)
यशवंत महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.कविता गंगाधर सोनकांबळे यांच्या मातोश्री कालवश राधाबाई पिराजी वाघमारे यांचे दि.२१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता वयाच्या ७८ व्या वर्षी वार्धक्याने दुःखद निधन झाले आहे. कालवश राधाबाई वाघमारे यांचा अंत्यसंस्कार दि.२२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता गोवर्धन घाट स्मशानभूमीत होणार आहे. अंतयात्रा त्यांचे राहते निवासस्थान संविधान अकॅडमी, शिवराय नगर येथून निघणार आहे.
यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी या दुःखद प्रसंगाची शोकसभा घेतली आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी प्रा. कैलास डाड, प्रा. एस. एल. कदम, डॉ. मीरा फड, डॉ. नीताराणी जैस्वाल, डॉ.रत्नमाला म्हस्के, डॉ.साहेब शिंदे, डॉ. अजय गव्हाणे, डॉ. वीरभद्र स्वामी, डॉ.स्वाती मदनवाड, प्रा. भारती सुवर्णकार, प्रा.प्रियंका शिसोदिया, प्रा.ज्ञानेश्वर पवार, प्रा. नरेंद्र कंचटवार, प्रा.श्रीकांत सोमठाणकर, डॉ.साईनाथ बिंदगे, डॉ. विजय भोसले, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, अभय थेटे, जगन्नाथ महामुने, नवनाथ धुमाळ, जगदीश उमरीकर, कपाळे, प्रसाद सावंत, बालाजी देशमुख, सौ. मनीषा बाचोटीकर, सौ. काकडे, भगवान कदम, सोपान पूयड, गुणवंत धर्माधिकारी, साई मोरे, शिवाजी मादेवाड आधी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Share

Related posts

क्रीडा स्पर्धा म्हणजे नव्या प्रतिभांना संधी मिळवून देणारे व्यासपीठ – श्री भैरवनाथ नायकवाडी

Chief Editor

सौ.अनिता रानवळकर यांना मराठी विषयात पीएचडी प्रदान

Chief Editor

कॅल्शियम हे एक आवश्यक मिनरल आहे जे आपल्या शरीराच्या अनेक कार्यांसाठी आवश्यक आहे. मीरा धुळगुंडे

Chief Editor

लोकशाही आणि जातीव्यवस्था एकत्र नांदू शकत नाहीत -डॉ.अजय गव्हाणे

Chief Editor

लोकशाही मूल्य रुजविण्यासाठी युवा संसद महत्त्वाची ठरते : श्रीमती चंद्रकला रावळकर

Chief Editor

निरोगी जीवनशैलीसाठी मूलभूत आरोग्य टिप्स :योगा करणे का गरजेचे आहे

Chief Editor

Leave a Comment