https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानसिकतेची भूमिका महत्वाची… : दिलीप डोंबे

नांदेड; नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या “मीट विथ थिएटर पर्सनॅलिटी” या कार्यक्रमात बोलत असताना मराठी चित्रपट व नाट्य दिग्दर्शक श्री. दिलीप डोंबे यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी मानसिकतेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते असे प्रतिपादन केले. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या भाषा व प्रयोग शाळेत सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. कल्पना कदम यांची उपस्थिती होती तर प्रमुख उपस्थिती मध्ये भाषा व प्रयोग शाळेचे समन्वयक डॉ. इर्शाद खान यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. जीवन म्हसुरे यांनी आपल्या प्रास्ताविकात या कार्यक्रमाचा उद्देश सांगून विध्यार्थ्यांना विवीध क्षेत्रात करिअर च्या संधी विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. दिलीप डोंबे यांनी “इम्पॉर्टन्स ऑफ कास्टिंग” या विषयावर बोलत असताना त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून ते राष्ट्रीय पुरस्कारा पर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मांडत असताना जीवनात यशस्वी होण्यासाठी मानसिकतेची काय भूमिका असते याचे महत्त्व विषद केले. अस म्हटल जाते की तुमची बाहेरील उपलब्धी तुमच्या आतील (मनातील) मूल्यांच्या संग्रहांचे प्रतिबिंब असते. तुमची मनोवृत्ती ही एक अशी गोष्ट आहे की, आज तुम्ही जे कोणी आहात आणि भविष्यात जे कुणी बनणार आहात हे ठरवणारी असते. तुमची मनस्थिती तुमची परिस्थिती घडवत असते, हे आज मानसशास्त्रीय अभ्यासातून सिद्ध झाले आहे. ज्याप्रमाणे मूर्तिकार एखाद्या मूर्तीचा आकार प्रथम आपल्या मनात तयार करतो, त्याचप्रमाणे ती मूर्ती आकार घ्यायला लागते. हेच आपल्या जीवनाला सुद्धा लागू पडते असे प्रतिपादन श्री. दिलीप डोंबे यांनी केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. कल्पना कदम यांनी केला आपल्या अध्यक्षीय समारोपात बोलत असताना विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास त्यांना आयुष्यामध्ये यश निश्चितच मिळणार असा मोलाचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप काळे यांनी केले तर आभार डॉ. इर्शाद खान यांनी केले. या वेळी महाविद्यालयातील विवीध प्राध्यापक, पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी डॉ. संजय कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704