ताज्या घडामोडी

यशवंत महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग कडुन भित्तिपत्रकाचे उद्घाटन

नांदेड :प्रतिनिधी
यशवंत महाविद्यालयाच्या लोकप्रशासन विभागाच्या अभ्यास मंडळाद्वारे तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचे उद्घाटन प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे लोकप्रशासन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. दीपक वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले
महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ.कविता सोनकांबळे, लोकप्रशासन विभागाचे विभाग प्रमुख डॉ.मिरा फड आणि डॉ. आर. पी. गावंडे यावेळी उपस्थित होते. हे भित्तिपत्रक बनवण्यासाठी डॉ. आर. पी. गावंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
केंद्र शासन व राज्य शासन जनतेच्या विकासासाठी अनेक योजना जाहीर करीत असते. गोरगरीब व तळागाळातील लोकांना महिलांना ,शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी त्याचबरोबर समाजातील वेगवेगळ्या घटकांना या योजनेच्या माध्यमातून अनुदान देऊन त्यांचा जीवन स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या अटी व निकषांमध्ये जे लाभार्थी बसतात त्यांना सरकारकडून अनुदान दिले जाते. परंतु हे अनुदान देत असताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो व लाभार्थ्यापर्यंत पूर्ण पैसे पोहोचले जात नाहीत म्हणून लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जमा केले जातात त्यासाठी डीबीटी या माध्यमाचा वापर केला जातो. डीबीटी म्हणजे काय ,डीबीटी चे फायदे कोणते आहेत , डीबीटी चा उद्देश काय आहे आणि डीबीटी हे नेमकं पोर्टल कस कार्य करते यासंबंधीची पूर्ण माहिती विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केली

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.