ताज्या घडामोडी

आज मानवत कृषि ऊत्पन्न बाजार समितीच्या सभागृहा मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन* *@)> जिल्हाध्यक्ष किशोर ढगे करणार मार्गदर्शन

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहा मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन दिनांक २७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे.
या महत्वपूर्ण बैठकिस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष मा. किशोर भाऊ ढगे, रामप्रसाद गमे (मामा ) मुंजाभाऊ लोंढे, भास्करराव खटिंग, केशवराव आरमळ, गजानन तुरे, यांची या वेळी महत्वपूर्ण उपस्थिती राहणार आहे.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत तालूक्यातील शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नावर व न्याय हक्कासाठी नेहमीच स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रशासन दरबारी प्रश्न मांडत असते याच अनुषंगाने आज मानवत तालुक्यातील शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नावर तसेच शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सिंचन विहीरी मिळाल्या मात्र विहिरीचे कुशल बिले अद्याप शासन स्तरावरून अदा करण्यात आले नाही.
त्यामूळे शेतकर्‍यांना अडचणीचा सामना करावा लागत आहेत.
या महत्व पूर्ण संदर्भात बैठकीत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात येणार असून पुढील आंदोलनाची दिशा ही ठरविण्यात येणार आहे.
या महत्वपूर्ण बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष मा. किशोर भाऊ ढगे हे उपस्थित शेतकऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असून या म्हत्वपूर्ण बैठकिस तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पदाधिकाऱ्यांनी मानवत कृषि उत्पन्न बाजार समिती सभागृहात सकाळी ठिक ११ वाजता मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मानवत तालुका अध्यक्ष विठ्ठलराव चौखट , नामदेव काळे पाटील यांनी केले आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.