एम सी आर

स्वा.रा.ती.म. विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रात ‘डेव्हलपमेंट स्टडीज’ पदविका अभ्यासक्रम सुरू – डॉ. महेश मगर

Uncategorized

नांदेड दि. 15 –
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रामार्फत आगामी शैक्षणिक वर्षापासून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डेव्हलपमेंट स्टडीज हा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य डॉ. महेश मगर यांनी मागील अधिसभा बैठकीत रूरल डेव्हलपमेंट अथवा डेव्हलपमेंट स्टडीज या विषयांशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत प्रस्ताव मांडला होता. मराठवाड्यातील ग्रामीण, सामाजिक व आर्थिक प्रश्नांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रमाची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले होते. अधिसभेमध्ये यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार, डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रामार्फत हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असून अभ्यासक्रमाची रूपरेषा, अभ्यासक्रम संरचना तसेच प्रवेश प्रक्रियेची नियमावली अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण यांनी तयार केली आहे. अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अनुषंगाने तयार करण्यात आला असून ग्रामीण विकास, विकास अध्ययन, सार्वजनिक धोरण, कृषी व सामाजिक-आर्थिक प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्था आणि क्षेत्रीय अभ्यास यांसारख्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
हा अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीचा असून दोन सत्रांमध्ये विभागलेला आहे. क्षेत्रभेटी, प्रात्यक्षिके, अहवाल लेखन, सादरीकरण आणि संशोधनाभिमुख अध्ययनावर विशेष भर देणे आदी अभ्यासक्रमामध्ये नमूद करण्यात आले आहे.
डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्र सुरू करण्यासाठी अधिसभेत प्रस्ताव मान्य करून घेतला होता. नोंदणीकृत पदवीधर मतदार निवडणुकीच्या जाहीरनामांमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्र सुरू करणार यांचाही समावेश होतो. माझ्या पहिल्याच अधिसभा सदस्य काळात ते सुरू झाले, याचा मला अभिमान आहे. आता माझ्या दुसर्‍या अधिसभा कार्यकाळात त्याच अध्यासन केंद्र पदविका अभ्यासक्रम सुरू केल्याबद्दल प्रशासनाचे डॉ. महेश मगर यांनी आभार मानले.
—————————————

Share

Related posts

स्वारातीम विद्यापीठात अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Chief Editor

नांदेड जिल्हा रेशीम हब बनविणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले*

Chief Editor

शुक्रवारी माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह व रोजगार मेळावा*

Chief Editor

सामाजिक समता सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ; फुले-आंबेडकर विचार आचरणात आणा – कुलगुरू डॉ मनोहर चासकर

Chief Editor

तुमची त्वचा सुंदर आणि स्वस्थ ठेवण्यासाठी त्वचेची काळजी कशी घ्यायची? मीरा धुळगुंडे आरोग्य सल्लागार

Chief Editor

अभिरुची आस्वाद’ मध्ये ऑस्करसाठी नामनिर्देशित झालेल्या ‘कवी’ या लघुपटाचे प्रदर्शन

Chief Editor

Leave a Comment