https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

ताडबोरगाव आणि रामपुरी महसूल मंडळाचा दुष्काळ यादीत सामावेश करा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मानवत तहसीलदार रणजितसिंग कोळेकर यांच्याकडे मागणी

,
_________________________________

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील ताडबोरगाव आणि रामपुरी महसूल मंडळाचा दुष्काळ यादीत सामावेश करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वतीने २७ नोव्हेंबर रोजी मानवत तहसिलचे तहसीलदार रणजित सिंग कोळेकर यांच्या कडे एका निवेदना द्बारे करण्यात आली आहे. शासनाने राज्यातील अनेक महसूल मंडळाचा सामावेश दुष्काळ यादी मध्ये केला आहे. परंतु मानवत तालुक्यातील रामपुरी आणि ताडबोरगाव हि महसूल मंडळ दुष्काळ यादीतून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे या महसूल मंडळातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून दुष्काळ त्यामूळे शेतकरी अनुदाना पासून वंचित आहेत. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये व बागायतीसाठी ७५ हजार रुपये मदत द्यावी तसेच रामपुरी आणि ताडबोर गाव या वंचित महसूल मंडळाचा सामावेस तात्काळ दुष्काळ यादित करून मदत द्यावी अन्यथा ०२ डिसेंबर रोजी शहरातील महाराणा प्रताप चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ ढगे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल अशा ईशारा हि या वेळी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला असून निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष तालुका अध्यक्ष नामदेव काळे पाटील सावळीकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष दत्तराव परांडे, मानवत तालुका अध्यक्ष विठ्ठलराव चौकट, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष गोविंद आबा घांडगे, मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, विशालराव यादव, सुरज काकडे पाटील, लक्ष्मण मामा शिंदे मानोलीकर , गोपाळ आबा काळे, दत्तराव काळे, अशोकराव काळे, महादेव काका काळे, अर्जुन काळे, गणेश काळे, प्रकाश काळे, केशव काळे यांच्या सह रामपूरी , ताडबोरगांव महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704