ताज्या घडामोडी

प्रा.डॉ.आनंद शेवाळे,डॉ.विशाल बेलुरे यांच्या ग्रंथास उत्कृष्ट ग्रंथ पारितोषिक सन्मान

नांदेड(प्रतिनिधी): दि,२९
मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ४६ वे तीन दिवसीय ‘राष्ट्रीय अधिवेशन’ ‘वाघिरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सासवड’ जि.पुणे येथे दिनांक २७ नोव्हेंबर रोजी संपन्न झाले. या अधिवेशनात मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्रीय ग्रंथासाठी परिषदेच्यावतीने दिले जाणारे प्रतिष्ठेचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उत्कृष्ट ग्रंथ पारितोषिक’ ‘गणितीय अर्थशास्त्र आणि अर्थमिती’ या ग्रंथासाठी महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथील डॉ.आनंद शेवाळे आणि शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. विशाल चंद्रशेखर बेलुरे, यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
अर्थशास्त्र या आत्यंत क्लिष्ठ व तांत्रिक समजल्या जाणार्‍या विषयातील मूलभूत संकल्पना सोप्या भाषेत शिकविण्याची ख्याती असणारे प्रा. डॉ. शेवाळे आणि डॉ. बेलुरे हे अत्यंत अभ्यासू व विद्यार्थीप्रिय शिक्षक असून त्यांच्या अनेक विद्यार्थीनी सेट-नेट, लोकसेवा आयोग, बँकिंग इत्यादी क्षेत्रातील विविध परीक्षांमध्ये सातत्याने यश संपादन केले आहे. स्वत:देखील या परीक्षा अनेकवेळा उत्तीर्ण असलेले डॉ.शेवाळे व डॉ. बेलूरे हे विविध सामाजिक चळवळीत हिरीरीने सहभागी होऊन वंचित व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा आधार देत आले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.