एम सी आर
Uncategorized

बदलीनंतरही जपलेले प्रेम अन् सन्मान; माजी शिक्षक गुलाबराव मदने यांचा भाऊराव चव्हाण माध्यमिक शाळेत भावनिक सत्कार

अर्धापूर (प्रतिनिधी )दि.२४ संस्थाअंतर्गत बदली होऊन श्री शारदा भवन हायस्कूल,अर्धापूर येथे कार्यरत असलेले या शाळेचे माजी शिक्षक गुलाबराव बालासाहेब मदने यांचा भाऊराव चव्हाण माध्यमिक शाळा, देगांव-येळेगांव येथे अत्यंत भावनिक वातावरणात शाल, हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संपूर्ण शाळा परिसरात आपुलकी, जिव्हाळा आणि कृतज्ञतेचे भाव व्यक्त झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ. ज्योती महाराज या होत्या. त्यांनी श्री.गुलाबराव मदने यांनी शाळेत कार्यरत असताना शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक तसेच शाळा विकासाच्या विविध उपक्रमांत केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत त्यांच्या सेवाभावाचे कौतुक केले. बदलीनंतरही त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानाने निमंत्रित करून सत्कार करण्यात आल्याने उपस्थित शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.
सत्काराला उत्तर देताना श्री. गुलाबराव मदने म्हणाले की, “शिक्षकाची बदली होते; पण त्याने निर्माण केलेली माणसे, नाती, संस्कार आणि आठवणी कधीच बदलत नाहीत. भाऊराव चव्हाण माध्यमिक शाळा ही माझ्यासाठी केवळ नोकरीचे ठिकाण नसून माझी कर्मभूमी आणि संस्कारभूमी आहे. येथे विद्यार्थ्यांना शिकवताना मलाही जीवनाचे अनेक मौल्यवान धडे शिकायला मिळाले. आज मिळालेला हा सन्मान माझ्या कार्याला मिळालेली सर्वोच्च पावती असून तो आयुष्यभर प्रेरणादायी ठरेल.”
यावेळी त्यांनी मुख्याध्यापिका सौ. ज्योती महाराज, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच शाळेच्या संपूर्ण परिवाराचे मनःपूर्वक आभार मानले. भविष्यातही शाळेच्या प्रगतीसाठी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कोणत्याही शैक्षणिक अथवा सामाजिक उपक्रमासाठी आपले सहकार्य कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या भावनिक सत्कार सोहळ्यामुळे शिक्षक-विद्यार्थी, सहकारी आणि संस्थेमधील जिव्हाळ्याचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले. उपस्थितांनी श्री. मदने यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या तसेच भाऊराव चव्हाण माध्यमिक शाळा ज्ञान, संस्कार आणि गुणवत्तेच्या क्षेत्रात अधिकाधिक यश संपादन करो, अशी भावना व्यक्त केली.

Share

Related posts

स्वा.रा.ती.म. विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रात ‘डेव्हलपमेंट स्टडीज’ पदविका अभ्यासक्रम सुरू – डॉ. महेश मगर

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठामध्ये ‘आयरिन्स व इन्फ्लिबनेट सेवा’ राष्ट्रीय कार्यशाळा

Chief Editor

माता रमाई यांच्या त्यागामुळे कोटी कोटी कुळांचा उद्धार -डॉ.अजय गव्हाणे

Chief Editor

नांदेड जिल्ह्यात केळीच्या दरात मोठी घसरणशेतकरी शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; दर नियंत्रणासाठी स्वतंत्र समितीची मागणी !

Chief Editor

यशवंत ‘मध्ये रोजगार मेळावा उत्साहात संपन्न

Chief Editor

यशवंत ‘मधील प्रा. ओमप्रकाश गुंजकर चार सुवर्णपदकांचे मानकरी‌

Chief Editor

Leave a Comment