एम सी आर

सुयोग इंग्लिश स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा:

Uncategorized

परभणी: शांतीनगर, येथील सुयोग इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी संस्थेच्या कोषाध्यक्ष सौ.पुष्पा मुंढे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर बहारदार समूह नृत्य सादर करून उपस्थितांची मन जिंकली. तसेच काही मुलांनी थोर पुरुषांच्या वेशभूषेत येऊन एकात्मतेचा संदेश दिला. तसेच काही विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतून तिरंगा झेंडा विषयी माहिती सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रताप संदलापूरकर यांनी केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे यांनी स्वातंत्र्यवीरांना स्मरून त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. त्याचबरोबर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्यवीरांच्या प्राणांच्या आहुतीनंतर इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेल्या भारत मातेने मोकळा श्वास घेतला त्याचमुळे अनेक स्वातंत्र्यवीरांना स्मरून हा दिवस देशभरात आनंदाने साजरा केला जातो असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अंजली झरकर यांनी केले तर आभार सुचिता सोनुने यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभम पाठक, सुकन्या मरगळ, जयश्री छानवाल,हिराबाई बोरकर, संगीता श्रॉफ आदींनी प्रयत्न केले.

Share

Related posts

यशवंत महाविद्यालयातील ‘वाचन कट्ट्याचे’ प्रथमेश तेलंग आता ‘झी-२४ तास’चे दिल्ली प्रतिनिधी!

Chief Editor

बहुजनांचे सुराज्य बनविणारे – छत्रपती शिवाजी महाराज

Chief Editor

जातीनिरपेक्ष व धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्व : डॉ.गौतम दुथडे* (-लेखक: डॉ.अजय गव्हाणे)

Chief Editor

शस्त्रक्रियेची भीती नको, योग्य माहिती हवी; सुरक्षित भूल हीच रुग्णसुरक्षेची गुरुकिल्ली!

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये इतिहास अभ्या ते ओस मंडळाचे उद्घाटन संपन्न* नांदेड :(दि. ८ ऑक्टोबर २०२६) यशवंत महाविद्यालयातील इतिहास विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने इतिहास अभ्यास मंडळाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते. उद्घाटक व प्रमुख अतिथी राष्ट्रसंत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ, अमरावती अंतर्गत मालेगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. गजानन सोडनार होते. याप्रसंगी इतिहास अभ्यास मंडळाचे तसेच ‘नंदगिरी’ भित्तिपत्रकाच्या फलकाचे विमोचन करण्यात आले. प्रमुख अतिथी डॉ. गजानन सोडनार यांनी, इतिहास हा विषय केवळ पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित न ठेवता क्षेत्रभेटी, ऐतिहासिक स्थळांना भेटी आणि प्रत्यक्ष अनुभवांच्या माध्यमातून शिकविल्यास विद्यार्थ्यांमध्ये इतिहास विषयाची गोडी निर्माण होईल, असे प्रतिपादन केले. इतिहासाच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांना भूतकाळाचे चिकित्सक आकलन होण्याबरोबरच वर्तमान समजून घेण्याची आणि भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी प्राप्त होते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी इतिहासाच्या सखोल अभ्यासाची गरज ओळखावी, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी,विद्यार्थ्यांनी इतिहासाच्या अभ्यासासोबतच संशोधनाची आवड जोपासली पाहिजे. संशोधन करताना प्राथमिक स्वरूपाच्या मूळ कागदपत्रांचा, अभिलेखांचा व अन्य ऐतिहासिक साधनांचा शोध घेऊन चिकित्सक पद्धतीने अभ्यास केल्यास संशोधन अधिक दर्जेदार आणि वस्तुनिष्ठ ठरते. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्याची, पुराव्यांच्या आधारे निष्कर्ष काढण्याची आणि इतिहासाकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहण्याची सवय विकसित करावी, असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविकात इतिहास विभागप्रमुख डॉ. शिवराज बोकडे यांनी, इतिहास अभ्यास मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक, संशोधनात्मक आणि सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमास डॉ. संगीता शिंदे (ढेंगळे), डॉ. साईनाथ बिंदगे, प्रा. राजश्री भोपाळे तसेच विद्यार्थी,विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.अजय गव्हाणे, संदीप पाटील, गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे यांनी परिश्रम घेतले.

Chief Editor

लेखन संस्कृतीला चालना देण्यासाठी श्री शारदा भवन हायस्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा

Chief Editor

Leave a Comment