एम सी आर
Uncategorized

महिलांनी कुटुंबासोबतच समाजाच्या विकासासाठी कार्य करावे : डॉ. विजया उफाडे

*
महिला दिनानिमित्त मराठवाडा विभागस्तरीय खुल्या महिला कबड्डी स्पर्धा
नांदेड- आजच्या काळात महिलांनी सामाजिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक क्षेत्रात आपले आस्तित्व निर्माण केले आहे. त्या स्वावलंबना सोबत स्वसुरक्षेतही सक्षम ठरत आहेत आणि कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास सिद्ध आहेत. महिलांनी केवळ कुटुंबाच्या विकासापुरते मर्यादित राहू नये, तर समाजासाठीही पुढे येऊन कार्य करावे, असे आवाहन प्रा. डॉ. विजया उफाडे – दाढेल यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित मराठवाडा विभागस्तरीय महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेत त्या अध्यक्षीय भाषणात बोलत होत्या.
सिडको येथील इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर ७ मार्च रोजी झालेल्या या कार्यक्रमात कोरो इंडिया, एकल महिला संघटना आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. उद्घाटन मन्नत तेलंगे यांच्या हस्ते करण्यात आले, तर प्रमुख पाहुणे कोरो इंडियाचे कार्यकर्ते लक्ष्मीताई वाघमारे, रुक्मिणी नागापुरे,लक्ष्मण भाऊ हजारे, रवींद्र भाऊ नन्नावरे मुंबई ,प्रा. वैशाली सावंत उपस्थित होत्या. कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघांना महापौर कविता मुळे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आले.
उपस्थितीमध्ये प्रमुख पाहुणे नगरसेविका सुवर्णा सतीश बस्वदे,निरंजना लांडगे,माजी नगरसेविका बेबी गुपिले ,संतोष मुळे ,तालुका क्रीडा अधिकारी बालाजी शिरशीकर, डॉ.रमेश नांदेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. इरवंत सूर्यकार यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा खानजोडे यांनी केले.
चौकट:
संकल्प महिला कबड्डी संघ लातूर यांनी प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक विठाई महिला कबड्डी संघ, अहमदपूर यांना व तृतीय पारितोषिक कुशीधारा महिला कबड्डी संघ सिडको यांना देण्यात आले.
उत्कृष्ट खेळाडू पुरस्कारामध्ये अनिता तेलंग,शीला जाधव,बायजाबाई यांना देण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजक मराठवाडा विभागातील संस्था – वंचित विकास लोकसंस्था नांदेडचे समता फेलो ज्ञानोबा सूर्यवंशी, संचालक रेखा सूर्यवंशी,रयत सेवाभावी संस्थेचे संचालक इरवंत सूर्यकार,सपना टोमके,भारतीय भटक्या विमुक्त जाती विकास संस्थेचे देविदास हादवे,गणेश शिंदे,जनजागृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संचालक अंकुश वाघमारे ,जिजामाता सेवाभावी संस्थेचे संचालक अण्णाराव सूर्यवंशी, जन विकास मंडळ बाऱ्हाळी चे संचालक एच.पी कमलाकर,समता फेलो आनंदा बनकर , मास्टर माधव पवार,रूढी ग्रस्त लोक वंचित कलावंत परिषद परभणीचे बायजाबाई, सन्मान सर्वांगीमानव विकास चे संचालक शिवाजी कांबळे, संकल्प सेवाभावी संस्थेचे संचालक दीपक कांबळे हे होते.

Share

Related posts

न्यायालयीन आदेशांच्या संपूर्ण अंमलबजावणीसाठी उद्या पासून आमरण उपोषण

Chief Editor

सामाजिक माध्यमे आणि समाज’ पुस्तक प्रकाशित समाजशास्त्र विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शक ग्रंथ

Chief Editor

नांदेडमध्ये घरफोडी प्रकरणाचा छडा तीन आरोपी अटकेत • रोख रक्कम जप्त

Chief Editor

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत मोठा निर्णय! लेफ्टनंट डॉ. किशोर इंगळे यांना मतदानाचा अधिकार बिनविरोध.

Chief Editor

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींची यशोगाथा; पोलिस भरतीत दोन विद्यार्थिनींची निवड

Chief Editor

फार्मा शिक्षक क्रिकेट स्पर्धेत स्वामी विवेकानंद फार्मसीचा संघ विजेता

Chief Editor

Leave a Comment