एम सी आर
Uncategorized

मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के पालकमंत्री अतुल सावे प्रशासनाच्या संपर्कात; परिस्थितीवर लक्ष

नांदेड, दि. ११ फेब्रुवारी :– मुखेड तालुक्यातील हिब्बट, कोळगाव, धामणगाव, मोटरगा, धनज व जामखेड या गावांमध्ये आज दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.२५ वाजता भूगर्भातून आवाज येऊन जमीन हलल्याची माहिती आहे.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळानुसार दुपारी १५:२० वाजता रिश्टर स्केलवर ३.० तीव्रतेचा भूकंप नोंदविण्यात आला असून त्याचा केंद्रबिंदू मुखेड तालुक्यातील खपराळ गावाजवळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हा धक्का अतिसौम्य स्वरूपाचा असून कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नसल्याची माहिती तहसीलदार, मुखेड यांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास दिली आहे.

या घटनेची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे प्रशासनाच्या सतत संपर्कात असून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या.
००००००

Share

Related posts

स्वामी विवेकानंद ‘क्षितिज-2026’ या वार्षिक स्नेहसंमेलनात तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

खऱ्या अर्थाने जगण्यासाठी सद्गुरु ओशो रजनीश यांचे क्रांतिकारी चिंतन

Chief Editor

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उच्च शिक्षणात आमूलाग्र बदल होतील. – प्राचार्य डॉ. रजनी शिखरे

Chief Editor

महामानव लोकशाहीर, साहित्यरत्न, डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

Chief Editor

आज शहरात आषाढी महोत्सवाचे आयोजन प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड व कौस्तुभ गायकवाड यांच्या भक्तीमय संगीतसरीचा लाभ घ्यावा – आयोजन विठ्ठल पावडे.

Chief Editor

महापालिका नांदेडच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यात शहरातील अपघातांना आळा घालण्यासाठी गतिरोधक बसवण्याचा समावेश करावा

Chief Editor

Leave a Comment