एम सी आर
Uncategorized

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘जागतिक आरोग्य दिना’निमित्त आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वरातीम विद्यापीठात ‘जागतिक आरोग्य दिना’निमित्त आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड: (डॉ.प्रवीणकुमार सेलूकर)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘विद्यार्थी विकास विभागा’तर्फे ७ एप्रिल ‘जागतिक आरोग्य दिना’निमित्त आयोजित विशेष आरोग्य शिबिराचा ९ एप्रिल २०२६ रोजी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात यशस्वी समारोप झाला. या शिबिराचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिरात वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार डॉ. मनीषा जायभाये (जीवन संजीवनी वेलनेस अँड फिटनेस सेंटर, बीड), आरोग्य सल्लागार राणी सानप तसेच प्रा. डॉ. अजय सूर्यवंशी यांच्या सहकारी पथकाने सहभाग घेतला. यावेळी सहभागींची प्राथमिक शारीरिक तपासणी करण्यात आली तसेच पोषण, फिटनेस आणि व्यायाम याबाबत सखोल मार्गदर्शन देण्यात आले. आधुनिक जीवनशैली लक्षात घेऊन बी.एम.आय. (BMI) तपासणीही मोफत करण्यात आली.
‘मेडिसिन-फ्री’ (Medicine-free) आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देत विद्यापीठ परिसरात आरोग्याविषयी जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. सकाळपासूनच तपासणीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन आणि कुलसचिव डॉ. डी. डी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर व रा.सो.यो संचालक डॉ. मारोती गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमात विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आरोग्याविषयी जागरूकता दर्शवली. या उपक्रमाचे शैक्षणिक वर्तुळातून सर्वत्र कौतुक होत असून विद्यापीठातील सर्व घटकांनी सक्रिय सहभाग घेत आरोग्याबाबत सजगता दाखवली.
—————————————–

Share

Related posts

डिजिटल युगात हिंदीतून रोजगाराच्या अमर्याद संधी -डॉ. कोमलकुमार परदेशी

Chief Editor

शेतात खत, घरात एकमत आणि गावात पत निर्माण करणारी रेशीम शेती करावी – जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे

Chief Editor

_विद्रोही साहित्य संमेलनात प्रख्यात सिने अभिनेते मिलिंद शिंदे यांची मुलाखत ठरली लक्षवेधी

Chief Editor

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उच्च शिक्षणात आमूलाग्र बदल होतील. – प्राचार्य डॉ. रजनी शिखरे

Chief Editor

लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम *प्राचार्य डॉ. गणेश जोशी

Chief Editor

स्वा.रा.ती.म. विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रात ‘डेव्हलपमेंट स्टडीज’ पदविका अभ्यासक्रम सुरू – डॉ. महेश मगर

Chief Editor

Leave a Comment