पाणिपूरवठा विभागाच्या दूर्लक्षामूळे पाण्याचा अपव्यय
*मानवत / प्रतिनिधी.*
*मानवत शहरातील नागरिकांना नगर परिषदेच्या पाणिपूरवठा विभागाच्या वतीने संपूर्ण प्रभागात पिण्याचा शुध्द पाणि पूरवठा केला जातो. पण गेल्या अनेक दिवसा पासून शहरातील अनेक भागात पाणिपूरवठा करणार्या जल वाहिण्या फूटल्यामूळे ( लिकिज ) शूध्द पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत असल्यामूळे नागरिकांतून चिंता व्यक्त केल्या जात आहे. मानवत नगर परिषदेच्या पाणि पूरवठा विभागाचे दूर्लक्ष होत असल्यामूळे नागरिकांतून संताप व्यक्त केल्या जात आहे.*
सविस्तर वृत्त असे की, *मानवत नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीमती, कोमल सावरे यांच्या आवाहनाला पाणिपूरवठा विभागाकडून हरताळ मानवत नगर परिषदेने नागरिकांना झरी तलावाची पाणि पातळी कमी झाल्यामूळे पाण्याचा अपव्यय टाळा पाणि काटकसरीने वापर करा असे आवाहन केले होते.*
*पण शहरातील अनेक भागातील जल वाहिण्या लिकिज झाल्यामूळे पिण्याचे शुध्द पाणि साडपाणी वाहून नेणार्या नाल्या तूंडूंब भरून वाहत आहे त्यामूळे ऐन उन्हाळ्यात पिण्याचे शुध्द पाणी रस्त्यावर वाहत असल्यामूळे नागरीकांतून हळहळ व्यक्त केल्या जात आहे.*
*मानवत नगर परिषदेच्या पाणि पूरवठा विभागाला लिकीज पाण्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्यामूळे नागरिकांतून संताप व्यक्त केल्या जात आहे.*
*मूख्याधिकारी यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखविणार्या पाणि पूरवठा विभागाकडे परभणी जिल्हाचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनीच लक्ष घालावे अशी मागणी जागृक नागरिकांतून होत आहे.*
*