दररोज मानवत बसस्थानकातून मानवत – पनवेल या बस सेवेचा प्रारंभ.
मानवत /प्रतिनिधी
पाथरी आगाराची बस आता मानवत बसस्थानकातून दररोज मानवत – पनवेल या नवीन बस सेवेचा नूकताच प्रारंभ करण्यात आला.
पाथरी आगाराची बस मानवत बसस्थानकातून मानवत पनवेल ही बस दररोज मानवत इथून सकाळी सात तीस ७/३० ला निघून ती सायंकाळी सात (७=०० ) | वाजता पनवेल येथे पोहोचेल परतीच्या मार्गात पनवेल येथून सकाळी सहा (६=०० ) वाजता निघून परभणीला रात्री आठ (८=०० ) वाजता पोहोचेल परतिचा मार्ग पनवेल परभणी आता राहील ही बस मानवत पाथरी माजलगाव गेवराई शेवगाव नगर शिरूर चाकण शिक्रापूर फाटा लोणावळा मार्गे पनवेल ला पोहोचेल परतीच्या यात मार्गाने मानवततून परभणीला पोहोचेल ही बस रात्री 8.15 सुमारास परभणी -पाथरी ला येईल. दिनांक 8 मे रोजी मानवत बस स्थानकात मानवत – पनवेल या बसचे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष नंदकुमारजी कुलकर्णी यांच्या हस्ते मानवत- पनवेल या बसच पूजन करण्यात आले. तसेच यांच्या हस्ते पाथरी आगर प्रमुख भोंडवे यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात.
आला तसेच महाराष्ट्र प्रवासी महासंघाचे तालुकाध्यक्ष एडवोकेट गजानन शिंदे व प्रवासी महासंघाचे जिल्हा संघटक व भाजप रेल्वे प्रवाशी प्रकोष्ठ ऍडव्होकेट सखाराम देवकते यांच्या हस्ते मानवत- पनवेल बसच्या चालक व वाहकाचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पाथरी आगाराचे अधिकारी धोंडीरामजी जाधव व मानवत बसस्थानकाचे नियंत्रक तेलभरे यांचा पूष्पहार घालून कृष्ण बाकळे व ऍडव्होकेट कोकरे यांच्या हस्ते सरकार करण्यात आला.
यावेळी भाजप परभणी जिल्हा रेल्वे प्रवासी प्रपोजचे जिल्हा सहसंयोजक के.डी. वर्मा सदस्य ऍडव्होकेट गणेश मोरे च राधिका मनियार प्राध्यापक श्रीमती शारदा कच्छवे, विलास मिटकरी पत्रकार विलास बारहात्ते बसस्थानक कर्मचारी राजेश ढालकरी इत्यादी तसेच प्रवासी उपस्थित होते पाथरी आगाराचे व्यवस्थापक भोंडवे यांच्याशी चर्चा करताना मानवत- सोलापूर ही परत येताना पाथरी पर्यंत येते ती मानवत पर्यंत सोडावी तसेच सोनपेठ या शहरासाठी सोनपेठ – संभाजीनगर वाया मुदगल. पाथरी. माजलगाव. गेवराई. मार्गे नवीन बस सेवा सुरू करण्यासाठी मागणी करण्यात आली. त्या बरोबर बीड विभागातील गेवराई. पाटोदा. बीड .आगाराच्या बस वाहक व चालक हे प्रवाश्यांना मानवतरोड रेल्वेस्टेशन चा थांबा नाही म्हणून बसमधून उतरून देऊन अरेरावी ची भाषा वापरतात. अशा पाटोदा.गेवराई.बीड आगाराच्या बस वाहक व चालक यांच्या विरोधात अनेकदा तक्रारी नोंदवून काहीच उपयोग होत नाही. अशा गैरवर्तन करणार्या वाहक, चालक यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या वेळी करण्यात आली. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्याशी अनेकदा वाद होत आहे.
भारतीय जनता पार्टी रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ चे परभणी जिल्हा सहसंयोजक के.डी.वर्मा व मानवत येथील वर्षा बोरबने हे दोघे दिनांक ५ मे रोजी परभणीहून तपोवन एक्सप्रेस ने मानवत रोड रेल्वे स्टेशन येथे आले असताना रेल्वे गेटच्या जवळ बीड आगाराची एम.एच 09 ई.एम.9605 ही शयनयान बस उभी असताना. के डी वर्मा व वर्षा बोरबणे
यांनी वाहकाला विनंती केली मानवत पर्यंत येऊ द्या. वाहकाने या गाडीत उभे राहाता येत नाही. बस वाहकाच्या शेजारच्या बाजूला दोन प्रवासी बसलेले आढळून आले. पुन्हा एकदा विनंती केली असता.बस वाहकाने उद्घाट भाषा वापरून मला ऐकु येत नाही.
असे सांगितले व बस पुढे नेली. जेष्ठ पत्रकार , संपादक के.डी.वर्मा यांनी मानवत बसस्थानका मधील तक्रार बूकात तशी तक्रार नोंद केली.
बीड विभागातील गेवराई पाटोदा बीड या आगाराच्या वाहक व चालकांवर कारवाई करावी जेष्ठ पत्रकार संपादक के.डी. वर्मा यांनी केली आहे.
***