मानवत येथे राम कथेचे आयोजन ; पंचकोशितील भाविक भक्तांनी राम कथेचा लाभ घ्यावा
मानवत / प्रतिनिधी
मानवत तालूक्यातील रूढी येथील संत ज्ञानेश्वर माऊली आश्रमाचे महंत गुरुमाऊली परमपूज्य गुरूवर्य श्री १००८ महामंडलेश्वर मनिषानंद पुरीजी महाराज यांच्या जीवनगौरव सोहळ्या निमीत्त मानवत येथे भव्य श्री रामकथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.
रामकथेचे प्रवक्ते रामायणाचार्य श्री. ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या सुमधूर रसाळ वाणीतुन रामकथेचे रसपान होणार आहे. त्या निमीत्ताने दिनांक १०/०५/२०२४ शुक्रवार रोजी स.ठिक ८.३० वा. अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर कथा मंडपाचे भूमिपूजन व धर्मध्वजाची स्थापना परमपूज्य गुरुवर्य श्री १००८ महामंडलेश्वर मनिवानंद पुरीजी महाराज यांच्या श्रीहस्ते संपन्न होणार आहे.
या वेळी प्रमुख उपस्थिती मा. श्री. 1008 स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज (येशवाडी) आमदार सुरेशरावजी अंबादासराव वरपुडकर (आमदार पाथरी विधानसभा) श्री. राजेश्वर सोपानराव कात्रूवार (श्री रामकथा यजमान यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी भाविक भक्तांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रामकथा ज्ञानयज्ञ संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे
***