ताज्या घडामोडी

राज्यस्तरीय पहिली टी -10क्रिकेट चषक नांदेड ने पटकवला !

——————————–
नांदेड :
महाराष्ट्र स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ-द-डेफ या फाउंडेशन च्या वतीने राज्यातील मुक -बधिर यांची पहिली टी -10 बधिर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पुणे येथे ४ व५ मे रोजी पार पडली.या पहिल्या राज्यस्तरीय चषकावर नांदेडच्या क्रिकेट संघाने नाव कोरले.
राज्यातील मूक -बधिर खेळाडूं साठी महाराष्ट्र डेफ प्रीमियर लीग टेनिस बॉल च्या पहिल्या टी-10 (टी -टेन) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पुणे येथील एसपी कॉलेज येथे ४ व ५ मे रोजी आयोजित करण्यात आले होते या राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील २४ मूक बधिर क्रिकेट संघांनी भाग घेतला होता
नांदेड येथील प्रशिक्षक व सह व्यवस्थापक रमाकांत गजभोर याच्या मार्गदर्शना खाली क्रिकेट संघाने सहभाग घेतला होता
कप्तान श्रीधर राजारेड्डी आलुरवाड (कर्णधार) याच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत पहिला चषक जिकला व जिल्ह्याचे नाव राज्यात केले
.चंद्रकांत धुमाळ (उपकर्णधार), श्री.जयवंत देविदास हटकर, श्री.पांडुरंग नरेवाड, श्री.विष्णू मुंजाजी वळसे, श्री.आकाश खिल्लारे, श्री.सय्यद हारून, श्री.गजेंद्र दासरवार, श्री.गणेशसिंह ठाकूर, श्री.ज्ञानेश्वर नकाते, श्री.संदिप रामराव दामलवार, श्री.साईनाथ सुर्यवंशी, श्री.शंकर पिलगुंडे, श्री.प्रशिक्षक सह व्यवस्थापक- श्री. रमाकांत गजभोर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.