व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना समज द्या…l आमदार, सुरेशरावजी वरपूडकर.

मानवत:
मानवत शहरातील शेळ्या, मेंढ्या, बकरे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. त्रास वाढत जात असल्याने आ. सुरेश वरपूडकर यांच्या सह व्यापाऱ्यांनी शुक्रवारी मानवत पोलीस ठाणे गाठून त्रास देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना समज द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
मानवत शहरातील शेळ्या मेंढ्यांचा खरेदी- विक्रीचा व्यवसाय व्यापारी मोठ्या प्रमाणावर करतात. शेळ्या, मेंढ्या, बकरे खरेदी करून ते एकत्रितरीत्या मोठ्या वाहनातून जवळील आंध्र प्रदेश राज्यात पाठवले जातात. मात्र, स्थानिक पोलिसांकडून विविध नियम दाखवून नाहक व्यापार्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी यावेळी केला आहे. सद्या त्रास कमी होण्या ऐवजी दिवसोनदिवस वाढतच चालल्याने शहरातील व्यापाऱ्यांनी पाथरी विधान सभा मतदार संघाचे आमदार मा. सुरेशरावजी वरपूडकर यांच्याकडे मागणी केली. या बाबतची दखल घेऊन शुक्रवारी सकाळी आमदार, सुरेशरावजी वरपूडकर आणि शहरातील व्यापाऱ्यांनी मानवत पोलीस ठाणे गाठून मानवत शहरातील व्यापाऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना समज द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय काॅग्रेस कमिटीचे मानवत शहर अध्यक्ष शामभाऊ चव्हाण, माजी नगर सेवक अनंत मामा भदर्गे, माजी नगर सेवक अफसर अन्सारी , युनूसभाई मिलनवाले, सय्यद आरेफ, गणेशराव दहे, आरेफ सय्यद, पवन बाराहाते आदीसह व्यापारी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या दरम्यान, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे.
***