सौ सरस्वती चव्हाण विद्यालय वझुर बु. शाळेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत विविध उपक्रम संपन्न

*
मानवत / प्रतिनिधी.
आज सरस्वती चव्हाण विद्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आली होती त्यामध्ये किशोर किशोरवयीन विद्यार्थिनी साठी मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत समुपदेशन व बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयात होऊ लागलेला लठ्ठपणा मधुमेह डोळ्यांचे विकार अशा आजारांची माहिती व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यासाठी शिबिराचे आयोजन केले होते यात प्राथमिक आरोग्य केंद्र रामपुरी बु येथील सी एच ओ डॉक्टर नांदखेडकर आरोग्य सेवक शिंदे जे बी नर्स श्रीमती यादव एस एम यांनी विद्यालयातील विद्यार्थिनींना समुपदेशन केले तसेच विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी यांची आरोग्य तपासणी केली शाळेतील विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुण्याचे योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक करून दाखवून त्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहाराविषयी व खेळाविषयी मार्गदर्शन केले या शिबिरासाठी शाळेचे मुख्याध्यापक कांबळे सर तसेच या उपक्रमाचे विभाग प्रमुख राजेश चव्हाण सर रागोले सर रोडे सर श्रीमती साबळे मॅडम यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र रामपुरी बु येथील डॉक्टर नांदखेडकर आरोग्य सेवक शिंदे नर्स यादव मॅडम उपस्थित होते. तसेच तसेच विद्यार्थ्यामार्फत वर्ग सजावट शाळा सजावट शाळेच्या आवारात केलेल्या वृक्षरोपणास संरक्षण रंग रंगोटी व जोपासना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने परसबाग निर्मिती करून त्यामध्ये आरोग्यदायी भाज्यांची लागवड शाळेतील विद्यार्थी विद्यार्थी व उपक्रमाचे विभाग प्रमुख भस्के भगवान सर यांनी सहभाग घेतला होतो.
***