एमफुक्टो-स्वामुक्टा’ संघटने द्वारा आयोजित मोर्चात प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
नांदेड: प्रतिनिधी
१६ ऑगस्ट रोजी ‘एमफुक्टो-स्वामुक्टा’ संघटने द्वारा आयोजित मोर्चात प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन* उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून भारतीय संविधानातील तरतुदींमध्ये “घरगुती पद्धतीने बदल करून” सुरु असलेल्या मनमानी कारभाराच्या विरोधात व प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने (एमफुक्टो) आखलेल्या कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनास एमफुक्टो संलग्नित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ टीचर्स असोसिएशन (स्वामुक्टा) चा जाहीर पाठींबा व सक्रिय सहभाग राहणार असून या आंदोलतील पुढचा टप्पा म्हणून ‘स्वामुक्टा’ संघटनेच्या वतीने दि. १६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता स्वा.रा.ती.म. विद्यापीठवर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील मोर्चा विद्यापीठ मुख्य प्रवेशद्वार ते प्रशासकीय इमारत असा निघणार असून मोरच्याद्वरे कुलगुरूंना निवेदन दिले जाणार आहे.
आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दि १८ जुलै २०१८ रोजीच्या अधिसुचनेची जशास तशी अंमलबजावणी करावी; एम.फिल. धारक प्राध्यापकांना पदोन्नतीचे लाभ तात्काळ प्रदान करावेत; एम.फिल व पीएच.डी करिता प्रोत्साहनपर वेतनवाढ सुरू ठेवावी, सहयोगी प्राध्यापक पदोन्नतीचे लाभ हे पात्रता दिनांकापासून देण्यात यावेत; १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी; पूर्णवेळ प्राध्यापकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी; नेट-सेट मुक्त शिक्षकांना नेमणुकीच्या तारखेपासून सेवा ग्राह्य धरून जुनी पेन्शन योजनेचे लाभ देण्यात यावे; प्राध्यापकांना अनुज्ञेय असलेल्या सर्व प्रकारच्या रजा लागु करण्यात याव्यात; विद्यापीठ कायदा २०१६ यास अनुसरून एकरुप परिनियम लागु करावे आदि मागण्यांचा समावेश आहे.
या मोर्चाला संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. सुर्यकांत जोगदंड, सचिव डॉ. विजय भोपाळे, कोषाध्यक्ष डॉ. दिलीप पाईकराव, उपाध्यक्ष डॉ. डी. एन. मोरे, डॉ. करूणा देशमुख, डॉ.विष्णू पवार, डॉ. लक्ष्मण शिंदे हे मार्गदशन करणार आहेत.
तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील पूर्णवेळ व तासिका तत्वावर कार्यरत सर्व प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन स्वामुक्टाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष डॉ. गौतम दुथडे,
, सचिव डॉ. रामचंद्र भिसे, कोषाध्यक्ष डॉ.आर.डी. शिंदे , उपाध्यक्ष डॉ.सुनिल व्यवहारे, डॉ.शिल्पा शेंडगे , डॉ. अनिल जाधव, डॉ. तुकाराम बोकारे, डॉ. अशोक जाधव, डॉ. महानंदा राऊतखेडकर, यांनी केले आहे.