मानवत नगर परिषदेच्या प्रांगणात संपन्न होणार्या *ध्वजारोहनास* मोठ्या संख्येने उपस्थित रहा : मुख्याधिकारी, श्रीमती कोमल सावरे.
मानवत / प्रतिनिधी.
मानवत नगर परिषदेच्या प्रांगणा मध्ये १५ आॅगष्ट स्वातंत्र्य दिना निमित्त सकाळी ७/४५ वाजता संपन्न होणार्या ध्वजारोहनास मानवत शहरातील
माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, माजी सैनिक, सेवानिवृत्त कर्मचारी, सर्व पत्रकार बांधव व प्रतिष्ठीत नागरिक समाज सुधारक, सामाजीक कार्यकर्ते व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मानवत नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
मानवत .
सविस्तर वृत्त असे की, आझादी का अमृत महोत्सव निमित्त शहरात विविध कार्यक्रम राबविण्यात येत असून दिनांक १५ आगष्ट स्वतंत्र दिनानिमित्त मानवत नगर परिषदेच्या प्रांगणात संपन्न होणार्या झेंडावंदन या कार्यक्रमान नागरीकांनी ठिक ७/४५ मिनिटाच्या आधी वेळेवर नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
नगर परिषद मानवत कार्यालयात *स्वातंत्र्य* दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम दि. 15/08/2024 रोजी सकाळी ठीक 7:45 वाजता मा. श्रीमती कोमल सावरे, प्रशासक तथा मुख्याधिकारी याच्या शुभ हस्ते आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी सदरील झेंडावंदनाच्या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी केले आहे.
**