विद्यार्थी जीवनात सातत्य हाच यशाचा पर्यायी शब्द :- निवासी उपजिल्हाधिकारी, मा. अनुराधा ढालकरी
मानवत / प्रतिनिधी.
तंत्रज्ञानाच्या विस्मयकारक प्रगतीच्या काळात वाढणारी आजची युवा पिढी आहे. करिअरचे अनेक पर्याय त्यांना उपलब्ध होत आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी हा पारंपारिक तसेच सक्षम पर्याय जरी असला तरी त्या अंतर्गत वेगाने होणारे बदल व नाविन्यपुर्ण पद्धती ह्या बाबी विद्यार्थ्यानी आत्मसात केल्या व आपल्या तयारीत सातत्य राखले तर ते यशास नक्कीच गवसणी घालू शकतील असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी मा. अनुराधा ढालकरी, परभणी तसेच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी यांनी केले. के के एम महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कै. सेठ रतनलाल काबरा , श्रीमती कोंडाबई कचरूसेठ कटारिया व अन्य पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रमुख अतिथी या नात्याने त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या की, या महाविद्यालयाचे ग्रंथालय अत्यंत समृध्द आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी त्यांना या सुविधेचा लाभ झाल्याची आठवण त्यांनी नोंदवली. काळ गतीने बदलत आहे हे ओळखून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी सक्षमपणे स्व: तास सिध्द करावे असेही त्या म्हणाल्या. या प्रसंगी त्रेपन हजार तिनशे पंचावन रुपयाची १३१ पारितोषिके गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. तेहरीन शेख व आलम शेख या विद्यार्थ्यानी सर्वाधिक अनुक्रमे वीस आणि तेरा पारितोषिके प्राप्त केली. तसेच महाविद्यालयाच्या ‘मानवता या वार्षिकांकाचे ही त्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भास्कर मुंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.संस्थेचे सचिव मा. बालकिशनजी चांडक यांनी या प्रसंगी आपले विचार व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष मा. विजय कुमारजी कत्रुवार यांनी अध्यक्षीय मनोगत मांडले. संस्थेचे कोषाध्यक्ष मा. रामचंद्र कत्रुवार, कार्यकारणी सदस्य मा. विजय दलाल, मा दिलीपजी हिबारे, मा. ज्ञानेश कत्रुवार, उपप्राचार्य डॉ किशोर हुगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे दुर्गेश रवंदे यांची मंचावर उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रोफेसर शारदा राऊत यांनी केले , पारितोषकांचे वाचन समिती प्रमुख प्रा, संजू देशमुख व प्रा. विनोद हिबारे यांनी केले. आभार प्रा. अनिल कापसे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी यांच्यासह पालकांची याप्रसंगी लक्षवेधी उपस्थिती होती.
**