ताज्या घडामोडी

हर घर तिरंगा अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

मानवत / प्रतिनिधी.

आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी नगरपरिषद कार्यालय मानवत यांच्या वतीने हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे.
संपूर्ण शहरामध्ये हर घर तिरंगा अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. या काळामध्ये वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत यामध्ये तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा प्रतिज्ञा, सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा ट्रीब्युट, तिरंगा मेला तिरंगा सेल्फी त्याचबरोबर अशा अनेक विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अभियान राबविण्यात येत आहे.
या अनुषंगाने मानवत शहरांमध्ये नगर परिषद कार्यालय मानवत यांच्या वतीने हर घर तिरंगा अभियानांतर्गत भव्य मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते. सदरील तिरंगा मॅरेथॉन ही नगरपरिषद कार्यालय मानवत ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशी काढण्यात आली. या तिरंगा मॅरेथॉनला श्री. पांडुरंग माचेवाड, तहसीलदार मानवत, श्रीमती. कोमल सावरे, मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद मानवत, श्री. संदीप बोरकर, पोलीस निरीक्षक मानवत यांच्या हस्ते हिरवा सिग्नल दाखवून सुरुवात करण्यात आली व मान्यवरांनी देखील सहभाग नोंदविला. या तिरंगा मॅरेथॉन मध्ये देशभक्तीपर घोषणाबाजी व गीत गायन करण्यात आले. यामुळे शहरांमध्ये देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.
याच्या माध्यमातून नगरपरिषद कार्यालयाच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांना दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट अशा एकूण तीन दिवस प्रत्येकाने आपापल्या घरावरती, दुकाने, आस्थापना, याचबरोबर सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय इत्यादी ठिकाणी तिरंगा ध्वज लावावा असे आवाहन करण्यात आले.याचबरोबर शहरांमध्ये असे विविध संस्कृती पर कार्यक्रम नगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहेत व याच पुढेही उत्स्फूर्तपणे राबविण्यात येतील व शहरातील सर्व नागरिकांनी स्वच्छतेबाबतीत जागरूकता दर्शवावी आपले घर- परिसर अंगण स्वच्छ ठेवावे,व तसेच शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास मदत करावी हा पण देशसेवेचाच एक भाग आहे. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा काही कार्यक्रम महत्त्वाचे असतात यामुळे शारीरिक व्यायाम होतो,मन प्रसन्न होते, त्याचबरोबर आत्मीयता, एकात्मता व तसेच देशाविषयी एकनिष्ठता व देशसेवा निर्माण होते. वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये शहरातील नागरिकांनी आपला सहभाग वाढवावा असे आवाहन श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद मानवत यांनी सांगितले.
सदरील मॅरेथॉन मध्ये शहरातील इतर मान्यवर व नागरिक यांनी सुद्धा सहभाग नोंदविला. प्रमुख सहभाग मा.श्री.माचेवाड, तहसीलदार मानवत, मा.श्री.बोरकर, पोलीस निरीक्षक मानवत यांनी नोंदविला.
याचबरोबर नगर परिषद मानवतचे सर्व अधिकारी कर्मचारी यामध्ये श्रीमती कोमल सावरे, मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद मानवत, अभियंता श्री सय्यद अन्वर,कार्यलीयन अधीक्षक श्री भगवान शिंदे,आर.बी.चव्हाण, भारत पवार,मुंजासा खोडवे लेखापाल, महेश कदम अंतर्गत लेखापरीक्षक,एस.बी उन्हाळे कर निरीक्षक, हनुमंत बिडवे,श्री.रवी दहे,दीपक सातभाई, श्री.संतोष खरात संगणक अभियंता, श्री विनय आडसकर पाणीपुरवठा अभियंता,श्री. शताणिक जोशी विद्युत अभियंता, श्री राजेश शर्मा, श्री.मनमोहन बारहाते,श्री.नारायण व्यवहारे, श्री.भगवानराव बारटक्के,एस.एन,रुद्रवार, पंकज पवार भंडारपाल, मुंजाभाऊ गवारे स्वच्छता निरीक्षक,एस.एस काळे, नारायण काळे, मुंजाजी डोळसे, सचिन सोनवणे,यशपाल भदर्गे, रितेश भदर्गे, शेख वसीम,सय्यद जावेद,सुनील कीर्तने,संजय कुऱ्हाडे,दीपक भदर्गे, बाळू लाड,बळीराम दहे, लईक अन्सारी, संजय कुऱ्हाडे,कांचन झोडपे, श्रीमती वंदना इंगोले श्रीमती शितल सोळंके, श्रीमती श्रीमती सुनिता वाडकर, श्रीमती सीमा कंची, भारती भदर्गे, तसेच स्वच्छता विभागातील सर्व कर्मचारी कर्मचारी उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.