मानवत मध्ये घरोघरी तिरंगा अभियानाचा शुभारंभ
मानवत / प्रतिनिधी.
आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान हरघर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. या अनुशंघाने श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांचा प्रमुख उपस्थितीत नगर परिषद मानवत च्या ज्येष्ठ कर्मचारी श्रीमती चंद्रकलाबाई गोविंद भाले सफाई कामगार यांच्या हस्ते नगर परिषद कार्यालय मानवत चा ध्वजारोहण सकाळी ७.५५ मिनिटांनी करण्यात आला यावेळी नगरपरिषद कार्यालयाचे सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
याचा मुख्य उद्देश स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान होऊन प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जागृत व्हावी यासाठी अभियानांतर्गत घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये मानवत शहरातील लोकप्रतिनिधी,विद्यार्थी व सर्व नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करावे असे आवाहन मा. श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद मानवत यांनी केले.
***