तालूका विधी सेवा समिती, *मानवत तालूका वकिल संघ* यांच्या संयूक्त विद्यमाने कायदे विषयक जनजागृती शिबिर के.के.एम. महाविद्यालयात संपन्न
मानवत / प्रतिनिधी.
कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम के के एम महाविद्यालय मानवत येथे मानवत तालुका विधी सेवा समिती व वकील संघ मानवत यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला जागतिक युवा दिन जागतिक आदिवासी दिन, दारिद्र्य निर्मूलन दिन, अँटी रॅगिंगला लॉ. या विषयावर व्याख्यानाच्या आयोजन करण्यात आले होते, ऍड.श्री एम आर बारहाते,- जागतिक युवा दिन, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.पंडित लांडगे – जागतिक आदिवासी दिन, ऍड.आर एन पाटील – दारिद्र्य निर्मूलन दिन, ऍड.श्री एम व्ही पाटील – अँटी रॅगिंग लॉ.. या विषयांवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. वरील विषयांवर वक्त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले .कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आदरणीय दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा अध्यक्ष तालुका विधी समिती मानवत श्री. जी. ए.करजगार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे उपस्थित होते. वकील संघ अध्यक्ष ऍड दिनेश दशरथे उपस्थित होते.
या वेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ.भास्कर मुंडे यांनी केले, यावेळी मानवत न्यायालयाचे न्यायाधीश श्री. जी.ए.करजगार यांनी न्यायालयीन व्यवस्था, आणि न्यायनिवाडा याबाबतीत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केलं सूत्रसंचालन डॉ. सुनिता कुकडे तर आभार डॉ. एस के शिंदे , प्रा. डाॅ. पंडीत लांडगे यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते.
***