ताज्या घडामोडी

पं. प्रदीप मिश्राजी यांची 23 ऑगस्ट पासून शिव महापुराण कथा – माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची माहिती.

नांदेड : दिनांक १५ :नांदेड शहर व जिल्ह्यातील भाविक भक्तांना महाशिवपुराण कथा ऐकता यावी आणि धार्मिक सोहळ्यात सहभागी होता यावे यासाठी आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ता, भागवत भूषण, पं. प्रदीप मिश्राजी सिहोरवाले यांच्या वाणीतून बारा ज्योतिर्लिंग शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 23 ऑगस्ट पासून शिवमहापुराण कथा सुरू होईल अशी माहिती माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व डॉ. शिवराज नांदेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

भाविक भक्तांची सेवा करता यावी यासाठी तत्कालीन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून जयाकिशोरीजी यांची श्रीकृष्ण कथा आणि श्री राम कथा सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविक भक्तांनी या सत्संगाचा लाभ घेतला होता. भव्य दिव्य अशा सोहळ्यानंतर आता श्रावण मासाचे औचित्य साधत जिल्ह्यातील शिवभक्तांसाठी पं. प्रदीप मिश्राजी सीहोरवाले यांच्या वाणीतून बारा ज्योतिर्लिंग शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. मोदी मैदान असर्जन नांदेड येथे दिनांक 23 ते 29 ऑगस्ट या दरम्यान हा सोहळा पार पडणार असून या सोहळ्याला जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, डॉ. शिवराज नांदेडकर, प्रशांत पातेवार, माजी आमदार ओमप्रकास पोकर्णा. जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय पाटील कराळे यांनी केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.