https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
क्रीडा व मनोरंजन

विवेकानंद महोत्सव ‘युवा अंतरंग-2024’ वार्षिक स्नेहसंमेलनात तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

उदगीर :प्रतिनिधी: येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ,उदगीर संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय व स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विवेकानंद महोत्सव ‘युवा अंतरंग-2024’ वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर जगताप होते तर उदघाटक व प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर, उदगीर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक करण सोनकवडे, श्रीपाद सिमंतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी व्यासपीठावर स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्यवस्थापिका ज्योती स्वामी, अध्यापक महाविद्यायाचे प्राचार्य डॉ. गोपाळ पवार, जय हिंद पब्लिक स्कूलचे प्राचार्य संजय हट्टे, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या ज्योती तारे, फ्लोरेन्स नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य नागेसन तारे,उपप्राचार्य तथा IQAC समितीचे समन्वयक डॉ. धनंजय गोंड,जय हिंद पब्लिक स्कूलचे उपप्राचार्य सतीश वाघमारे, नॅबेटच्या समन्वयक मनोरमा शास्त्री, अतेंद्र सिंग, परीक्षा नियंत्रक डॉ.शेषनारायण जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अमर तांदळे, सांस्कृतीक व पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.राहुल पुंडगे, विद्यार्थी कल्याण मंडळाची सचिव कादरी सय्यदा हजेरा, विद्यार्थिनी प्रतिनिधी साक्षी बिरादार, क्रिडा प्रतिनिधी मुस्तखिम शेख, सांस्कृतीक प्रतिनिधी रोहन कांबळे, एन एस एस प्रतिनिधी वैष्णवी निटूरे, यांच्या सह सर्व वर्ग प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रारंभी या स्नेहसंमेलनात स्वामी विवेकानंद व सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलन करून उदघाटन कऱण्यात आले. यावेळी उदघाटक सुंदर बोंदर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, वार्षिक स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्याच्या कला गुणांना वाव देणारे व्यासपीठ आहे.आपल्या सुप्त गुणांना प्रदर्शित करुन आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी अशा स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यानी मोठया संख्येने सहभागी झाले पाहिजे.अभ्यास तर महत्वाचा आहेसच पण आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासाठी ही स्नेहसंमेलने महत्वाची ठरतात. असे ते म्हणाले तर पोलिस निरीक्षक करण सोनकवडे यांनी आपल्या मनोगतात, विद्यार्थी हा देशाचे भवितव्य आहे.आज मोठया प्रमाणात समाज माध्यमाचा वापर विद्यार्थी करतात.पण हा वापर करीत असताना सावधानी बाळगावी.आपल्या अभ्यासाच्या निगडित असणाऱ्या बाबीच विद्यार्थ्यांनी सर्च कर्तव्यात आणि जास्तीत जास्त वाचनाची सवय लावून घ्यावी.असे ही ते म्हणाले.
यावेळी लोकमत या दैनिकाचे प्रतिनिधी व प्राचार्य श्रीपाद सिमंतकर यांनी देखील विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. तर या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षीय समारोपात डॉ. सुधीर जगताप असे म्हणाले की,आपल्या महाविद्यालयात विद्यार्थीना रोजगाराभिमुख शिक्षण दिले जाते. त्यासाठी वेग-वेगळे कौशल्य आत्मसात करणे विद्यार्थीनी गरजेचे आहे.विद्यार्थ्यांनी स्वतःहून आपणच आपली वाट निवडली पाहिजे.यश भेटत नाही तर यश प्राप्तीसाठी मेहेनत करावी लागते. आजचं युग हे स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात ज्ञान प्राप्त करावे. आपल्याला शिकविणाऱ्या गुरूचा नेहमी आदर करावा असे ते म्हणाले.
या स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. धनंजय गोंड व अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ पवार यांनी केले. यावेळी विद्यार्थी कल्याण मंडळाची सचिव कादरी सय्यदा हजेरा यांनी आपला वार्षिक अहवाल सादर केला.या अहवालात त्यांनी महाविद्यालयात होत असलेल्या विविध कार्यक्रमाचा तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाचा व अंमलात आणलेल्या योजनांचा उल्लेख करीत महाविद्यालयांमध्ये झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला.
सदरील स्नेहसंमेलनात स्वामी विवेकानंद महाविद्यालय व स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर एका पेक्षा एक सरस अशी कलाविष्कार सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. यासोबतच विद्यार्थ्यांनी लोकगीत, चित्रपट गीत, रिमिक्स गीतावर ठेका धरत उत्साह शिंगेला पोहचवला. तर विद्यार्थ्याचा सर्वात आवडीचा व आकर्षक असा शेलापागोटे हा कार्यक्रम संपन्न झाला. सुरवातीला ‘युवा अंतरंग 2024’ निमित्त महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.विजेत्या स्पर्धाकाला मान्यवराच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचलन प्रा. अमर तांदळे, प्रा. राखी शिंदे यांनी केले तर आभार ऋतूजा डिग्रस्कर यांनी मानले. हे स्नेसंमेलन यशस्वी करण्यासाठी प्रा. राशिद दायमी,प्रा. हणमंत सूर्यवंशी,प्रा.आकाश कांबळे, प्रा. संजीवनी भालेराव, प्रा. सोनल सोनफुले, प्रा. असिफ दायमी, प्रा. त्वरिता मिटकरी, प्रा. बालाजी सकणुरे, प्रा. मिनाक्षी घोडके, डॉ. दुर्गा स्वामी, प्रा. आवेज शेख, प्रा. नावेद मणियार, प्रा. ज्ञानेश्वर मुंडे, प्रा. वैष्णवी गुंडरे, प्रा. अनुजा चव्हाण, अमोल भातकुळे, प्रदीप पाटील, अपर्णा काळे, संदीप पवार, कुशलबाई गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

RAJ GAIKWAD

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704