https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

सारथी 4.0 संगणकीय प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू* ▪️ प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांचे सहकार्य करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 3 :- सारथी प्रणाली 4.0 च्या सर्व्हरचे तांत्रिक कामकाज लवकरच पूर्ण होणार असून तद्नंतर अर्जदारांना सारथी प्रणालीवरून अर्ज करणे सुलभ होईल. सर्व नागरिकांनी याची नोंद घेऊन विभागास सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन विभागातर्फे नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.

नागरिकांना अनुज्ञप्ती (लायसन्स) व अनुज्ञप्ती विषयक इतर सर्व कामकाजासाठी परिवहन विभागाच्या सारथी 4.0 प्रणालीवर अर्ज करणे व शासकीय शुल्क भरणे आवश्यक असते. परंतु मागील दोन दिवसपासून सारथी 4.0 प्रणालीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याचे देखभाल / दुरुस्तीचे काम राष्ट्रीय सूचना केंद्रातर्फे सुरू आहे. त्यामुळे परिवहन विभागाची संगणकीय सारथी 4.0 प्रणाली संथगतीने सुरू आहे. त्यामुळे अर्जदारांना काही अर्ज व तद्षनुंगीक शासकीय शुल्क भरताना अडचणी निर्माण होत आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704