गायरान जमीनी कसणाऱ्यांच्या नावे करा; विभागीय आयुक्तांनी काढलेल्या पत्राची तात्काळ अमलबजावणी करा
महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा ) ची मागणी
मानवत / प्रतिनिधी.
मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील गायरान जमिनी गायरान धारकांच्या नावे करण्यासाठी गायरान धारक अनेक वर्षा पासून आंदोलन करत आहेत. पात्र असून ही त्यांच्या नावे गायरान होत नाही याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटाच्या वतीने ०१ फेब्रुवारी रोजी पायी मोर्चा काढण्यात येणार आहे तसेच या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले होते.
यावेळी विभागीय आयुक्त यांनी ११ आणि २४ जानेवारी रोजी पत्र काढले असून कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्या काढलेल्या पत्राची तात्काळ व कायदेशीर अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून २५ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटाच्या वतीने मानवत तहसीलदार रणजितसिंग कोळेकर यांना निवेदन सादर करण्यात आले.
व यावेळी विविध मागण्या ही निवेदना द्वारे करण्यात आल्या आहेत या मध्ये दिनांक १४ एप्रिल १९९० पूर्वी पासून ताब्यात असलेल्या गायरान जमिनी कसणाऱ्याच्या नावे करा , गायरान जमिनीवरील घरासाठी झालेले अतिक्रमण नियमित करून बेघरांना घरकुलाचा लाभ द्या,आदी मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या असून निवेदनावर महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचे राज्य अध्यक्ष कॉ. मारोती खंदारे, जिल्हा सचिव कॉ. रामकृष्ण शेरे , जिल्हा अध्यक्ष कॉ. अशोक बुरखुंडे, जिल्हाउपाध्यक्ष कॉ. लिंबाजी धनले, राजेभाऊ जोंधळे, उत्तम गायकवाड, एकनाथ हरबडे, भास्कर गायकवाड, भागीरथ लांडगे, नंदकुमार लांडगे, नारायण लांडगे, अर्जुन पंडित, बालासाहेब पंडित, उत्तम सूर्यवंशी, विश्वनाथ तुपसमुंद्रे, सखाराम जाधव, तुकाराम जाधव, शंकर जाधव, नागोराव जोहरुले, आश्रोबा वाकळे, गीताराम तुपसमुंद्रे, संभाजी तुपसमुंद्रे, दामोदर तुपसमुंद्रे यांच्या सह गायरान धारक या वेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
***