स. शहा मं. हजरत तूराबूल हक्क यांच्या उरूसा निमित्त परभणी कडे जाणाऱ्या रापमंच्या बसेला तोबा गर्दी* *पाथरी आगाराने शटल बस सेवा सूरू करण्याची मागणी
मानवत / प्रतिनिधी.
राज्य भरात सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या परभणी येथील हजरत सय्यद शहा तुराबूल हक्क रहे यांच्या ऊरूसाला ०१ फेब्रुवारी रोजी पासून परभणी येथे सुरवात झाली. असून उरूस यात्रेच्या अनुषंगाने परभणी मध्ये अनेक ठिकाना वरूण नागरिक परभणीकडे येत असतात १५ फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या उरूस यात्रेस मोठया प्रमाणात नागरिक दाखल होत असून यामुळे महामंडळाचा एस. टी. बसेसला ही बस स्थानकात मोठी गर्दी पाहवयास मिळत आहे. अगोदरच जेष्ठ नागरिक अमृत योजना आणि महिला सन्मान योजनेमुळे एस. टी. महामंडळाचा प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळाचा बसेस ला गर्दी होत असून गुरुवार पासून सुरु झालेल्या उरूस यात्रेस मोठया प्रमाना त नागरिक परभणीकडे रवाना होत असून परभणीकडे जाणाऱ्या एस. टी. बसेसला प्रवाशांची गर्दी पाहवयास मिळत आहे परभणीकडे जाणाऱ्या एस. टी. बसेसच्या संख्येत वाढ करावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.
**