ताज्या घडामोडी

यशवंत ‘ मध्ये दि.९ फेब्रुवारी रोजी बौद्धिक संपदा हक्कावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

नांदेड:( दि.७ फेब्रुवारी २०२४)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय व वुईगो लायब्ररी फाउंडेशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दि.९ फेब्रुवारी २०२४, शुक्रवार रोजी ‘मास्टरिंग द माझे: डीमेंसीफाईंग इंट्यूलेक्चल प्रॉपर्टी राइट्स’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य राष्ट्रीय कार्यशाळा निमंत्रक व मुख्य आयोजक डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि संशोधन व विकास समितीच्या वतीने कार्यशाळा संघटक सचिव डॉ.एल.व्ही.पदमारानी राव, डॉ. एम.एम.व्ही.बेग आणि सहसंघटक सचिव डॉ.ए.एस. कुंवर यांनी या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
सकाळी १० ते सायंकाळी ४:३० दरम्यान संपन्न होणाऱ्या या कार्यशाळेत नाशिक येथील स्मिता माने, निलेश पावस्कर, पराग खेडकर, रावसाहेब घेदगे, निनाद कुलकर्णी आणि पुणे येथील डॉ.निखिल पाठक, मोहिनी सूर्यवंशी, आनंद जाधव, श्रीकांत जोशी या पेटंट क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
तरी या कार्यशाळेत सहभाग घेण्याचे आवाहन उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, समिती सदस्य डॉ.श्रीरंग बोडके, डॉ.संभाजी वर्ताळे,डॉ.संजय ननवरे,डॉ.वनदेव बोरकर, ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.नीरज पांडे, डॉ.बी. बालाजीराव, डॉ.अजय मुठे, डॉ.विजय भोसले, डॉ.एम.डी.अंभोरे, प्रा.ए.आर. गुरुखुडे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील यांनी केले आहे.
या कार्यशाळेस प्राध्यापकांना सहभागी होण्याकरिता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने कर्तव्य रजा परिपत्रक देखील काढले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.