https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आपला जिल्हा

मानवी कल्याणासाठी विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धा,मान्यवरांचा सूर

गडचिरोली,प्रतिनिधी :-

येथिल संत नगाजी महाराज प्रार्थना मंदिर, शाहूनगर येथे विविध क्षेत्रातील बालकलावंतांचा सत्कार विदर्भस्तरिय खंजिरी भजन स्पर्धा समिती व श्री गुरुदेव योग शिक्षण सेवा समितीच्या वतीने आयोजित स्नेहमिलन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आला होता.

विविध क्षेत्रातील बालकलावंतांचा सत्कार विदर्भस्तरिय खंजिरी भजन स्पर्धा समिती व श्री गुरुदेव योग शिक्षण सेवा समितीच्या वतीने यावेळी बाल मुष्ठीयोद्धा चैतन्य आवारी, बाल तबला वादक कुशल काळबांधे, बालवक्ता प्रसाद म्हशाखेत्री यांचा उपस्थित मान्यवरांचे हस्ते भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. आयोजित स्नेहमिलन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या अभंगातून मानवात किमान एक तरी कला अंगी असावी असे सांगतात. आधुनिक काळात सुद्धा जीवन सुखकर करण्यासाठी कलेची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तींनी किमान एक तरी कला अंगीकारावी, असा सूर विदर्भस्तरिय खंजिरी भजन स्पर्धा समिती व श्री गुरुदेव योग शिक्षण सेवा समितीच्या स्नेहमिलन सोहळ्यानिमित्त आयोजित बालकलावंतांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित मान्यवरांनी काढला.

या कार्यक्रमाला खुशरंग शेंडे, डॉ. संदीप लांजेवार, मनोजसिंह पवार, अतुल श्रृंगारपवार, रामकृष्ण ताजणे, उदय धकाते, नामदेव इजनकर, काशिनाथ दैवलकर, मारोतराव ऊईके, विजय गिरसावळे, रमेश नक्षिणे, अनिल बजाज, ज्ञानेश्वर बांबल आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात गुरुदेव प्रार्थनेने करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन, संचालन श्री गुरुदेव योग शिक्षण सेवा समितीचे संयोजक प्रविण मुक्तावरम यांनी केले. यावेळी संत नगाजी महाराज प्रार्थना मंदिर समितीचे पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704