https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
महाराष्ट्र

विमाशी जुनी पेन्शन साठी लढणार- आमदार सुधाकरराव अडबले

राज्य संघटनेत भविष्यात मोठी फुट पडणार

चंद्रपूर,प्रतिनिधी :-

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ येणाऱ्या काळात आपल्या विचार आणि ध्येयाशी समर्पित संघटना सोबत घेऊन आपली जुनी पेन्शन लढाई यशस्वी करण्यासाठी तिव्र आंदोलन करून जुनी पेन्शन मिळविल्याशिवाय स्तब्ध राहणार नाही अशी भूमिका  शिक्षक आमदार सुधाकरराव अडबले यांनी जाहीर केली आहे.यामुळे राज्य संघटनेत भविष्यात मोठी फुट पडणार काय याकडे राज्यभरातील चिंताग्रस्त कर्मचारी यांना लागली आहे. 

राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्रचे निमंत्रक विश्वासराव काटकर व सुकाणू समितीचे सदस्य यांचे सोबत दिनांक 20 मार्च 2023 रोजी मुख्यमंत्री कार्यालय मंत्रालय मुंबई येथे बैठक संपन्न झाली.

या बैठकीमध्ये मुख्यमंत्री यांनी जुनी पेन्शन योजनेप्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षिततेची हमी देण्याचे धोरण तत्व मान्य केले, त्याच प्रमाणे संपाच्या कालावधी दरम्यान कोणावरही कोणत्याही प्रकारची कार्यवाही होणार नाही असे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर पुढे अचानक समन्वय समितीचे निमंत्रकानी संप मागे घेतला असे वृत्तवाहिन्याण्यासमोर जाहीर केले. 

समन्वय समितीचे निमंत्रक विश्वासराव काटकर यांनी संप पुकारत्या वेळी “जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही” अशी ग्वाही निमंत्रक विश्वासराव काटकर दिली होती. मात्र जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतला नसतांना अचानकपणे संपातून माघार घेणे योग्य नव्हते. सदर संप हा फक्त महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचा नव्हता तर राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र यांचा होता.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आजही आपल्या जुनी पेन्शन च्या भूमिकेवर ठाम असून जुनी पेंशन योजने करिता आम्ही कोणतीच तडजोड करणार नाहीत. परंतु समन्वय समिती ने माघार घेतल्यामुळे आपणास इच्छा नसताना हा निर्णय मान्य करावा लागत आहे असे शिक्षक आमदार सुधाकरराव अडबले यांनी प्रसिदीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

सदर समन्वय समितीने जरी संपातून माघार घेतली असली तरी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ येणाऱ्या काळात आपल्या विचार आणि ध्येयाशी समर्पित संघटना सोबत घेऊन आपली जुनी पेन्शन लढाई यशस्वी करण्यासाठी तिव्र आंदोलन करून जुनी पेन्शन मिळविल्याशिवाय स्तब्ध राहणार नाही अशी भुमिका शिक्षक आमदार सुधाकरराव अडबले जाहीर केली आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704