https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
राजकीय

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

गडचिरोली,प्रतिनिधी :-

रक्तदान शिबिर आणि गोरगरिबांना धान्य वाटून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचा वाढदिवस गडचिरोलीसह अन्य ठिकाणी साजरा केला.

गडचिरोली येथे आयोजित रक्तदान शिबिरात ५० हून अधिक जणांनी रक्तदान केले. यावेळी महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.नामदेव उसेंडी, जिल्हा प्रभारी डॉ.नामदेव किरसान, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, विश्वजित कोवासे, डॉ.नितीन कोडवते, भावना वानखेडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, शिबिराच्या माध्यमातून संकलित केलेल्या रक्ताचा गरजू रुग्णांना लाभ होईल, असे उद्गार अतिथींनी काढले. 

अहेरी तालुक्यातील वेलगूर व नवेगाव येथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुश्ताक हकीम यांच्या नेतृत्वात गरीब नागरिक, विधवा, अपंग यांना जीवनावश्यक वस्तू आणि धान्य वितरण करण्यात आले. 

गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात काँग्रेसच्या अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष रजनिकांत मोटघरे यांच्या नेतृत्वात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704