एम सी आर

यशवंत ‘द्वारे शोधचक्र पोर्टलवर राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

Uncategorized

नांदेड (दि.१२ मार्च २०२६):
यशवंत महाविद्यालय आणि इन्फ्लिबनेट केंद्र, गांधीनगर, गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शोधचक्र’ पोर्टलवर एक दिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षण व जनजागृती कार्यशाळा दि.११ मार्च रोजी उत्साहात संपन्न झाली.
संशोधनातील सुसूत्रता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या उद्देशाने आयोजित या ऑनलाईन कार्यशाळेत देशभरातून २०० पेक्षा अधिक संशोधक, प्राध्यापक आणि ग्रंथपाल सहभागी झाले होते.
कार्यशाळेचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी केले. अध्यक्षीय समारोपात त्यांनी नमूद केले की, आजच्या डिजिटल युगात संशोधन केवळ ग्रंथालयापुरते मर्यादित राहिलेले नाही. शोधचक्रसारखी पोर्टल्स संशोधनामध्ये पारदर्शकता आणि जागतिक दर्जा कायम ठेवण्यासाठी अनिवार्य झाली आहेत.
इन्फ्लिबनेट केंद्राचे संचालक प्रो. देविका मडाल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सत्रात शास्त्रज्ञांच्या चमूने तांत्रिक मार्गदर्शन केले. डॉ. अभिषेक कुमार (शास्त्रज्ञ-ई) यांनी शोधचक्र पोर्टलच्या धोरणात्मक भूमिकेवर प्रकाश टाकला. श्री. नवनीत कुमार शर्मा (शास्त्रज्ञ-बी) यांनी संशोधनाच्या नोंदणीपासून ते प्रबंध सादरीकरणापर्यंतच्या टप्प्यांचे सादरीकरण केले. डॉ. सना असलम (ग्रंथालय अधिकारी) यांनी पोर्टलचा प्रत्यक्ष वापर कसा करावा, डॅशबोर्ड कसा हाताळावा आणि मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष कसे ठेवावे, याचे थेट प्रात्यक्षिक दाखवले.
कार्यशाळेचे नियोजन संयोजक सचिव ग्रंथपाल डॉ. कैलास वडजे यांनी केले. संशोधकांनी विचारलेल्या तांत्रिक शंकांचे इन्फ्लिबनेटच्या तज्ज्ञांनी निरसन केले. कार्यक्रमाचा समारोप प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय नंनवरे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, संजय भोळे, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले.
या कार्यशाळेमुळे यशवंत महाविद्यालयातील संशोधन प्रक्रिया अधिक गतीशील आणि डिजिटल होणार असून, संशोधकांना याचा मोठा लाभ मिळणार आहे. यशवंत महाविद्यालयाच्या शोधचक्र पोर्टलवर ४० संशोधक मार्गदर्शक व १५० पेक्षा जास्त विद्यार्थी सद्यस्थितीत नोंदणी करून प्रत्यक्षात वापर करत आहेत.

Share

Related posts

नांदेड: शहरातील डी मार्ट रस्त्यावर तिहेरी हत्याकांड; गँगवॉरनंतर रुग्णालयातही खून

Chief Editor

समाज कल्याण निरीक्षकांच्या पदोन्नतीची कोंडी दूर करण्याची मागणी नव्या आकृतीबंधातून दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न सोडविण्याची अपेक्षा

Chief Editor

निरोगी जीवनशैलीसाठी मूलभूत आरोग्य टिप्स:आरोग्य सल्लागार- मीरा धूळगुंडे

Chief Editor

*शाश्वत विकासासाठी युवक – जलसंधारण व्यवस्थापन आणि ओसाड भूमी विकास शिबीराचे जग्गुनाईक तांडा येथे उद्घाटन संपन्न* ()

Chief Editor

स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील क्रीडा महोत्सव-2026 ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

विद्यार्थ्यांमध्ये क्षमताधिष्ठित कौशल्य विकसित करत रोजगाराची संधी देणारे अभ्यासक्रम अभ्यास मंडळानी तयार करणे काळाची गरज. – डॉ.डी.एन.मोरे.

Chief Editor

Leave a Comment