एम सी आर

स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील क्रीडा महोत्सव-2026 ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Uncategorized

—————————————–
उदगीर :-येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयामध्ये क्रीडा महोत्सव -2026 ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदरील क्रीडा महोत्सव हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असून या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राचार्य डॉ. शेषनारायण जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अमर तांदळे, पत्रकारिता तथा विद्यार्थी कल्याण मंडळ विभागाचे प्रमुख प्रा.राहुल पुंडगे, क्रीडा विभाग प्रमुख प्रा.राशेद दायमी यांच्या उपस्थितीत या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले.
प्रारंभी दि. 27/02/2025 रोजी सकाळी 10:00 वाजता
भारतीय हॉकी पटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून क्रीडा महोत्सवाची सुरूवात केली. हे क्रीडा महोत्सव 27 जाने. ते 31 जाने.2026 या दरम्यान संपन्न झाले.या क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो- खो, धावण्याची स्पर्धा, चेस स्पर्धा,कॅरम स्पर्धा, बॅडमिंटन स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, हॉलीबॉल स्पर्धा विद्यार्थ्यासाठी आयोजित करण्यात आल्या होत्या.
सदरील क्रीडा महोत्सवातील विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण दि.05/02/2025 रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या उपस्थितीत होणार असून हे या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. असिफ दायमी,प्रा. वैष्णवी गुंडरे, प्रा. नावेद मणियार,प्रा. नम्रता कुलकर्णी, प्रा.रोहिणी वाघमारे, प्रा. अभिमन्यू भोसले, प्रा. अंजली रविकुमार, प्रा. पूजा माने, प्रा. सायमा पटेल, काजल सांगवे, खेळ प्रतिनिधी मुस्तखिम शेख, अमोल भाटकुळे, अपर्णा काळे यांच्यासह सर्व वर्ग प्रतिनिधी परिश्रम यांनी परिश्रम घेतले.

Share

Related posts

यशवंत ‘मध्ये दुग्धशास्त्र विभागाचा इंडक्शन प्रोग्राम संपन्न

Chief Editor

पुस्तकप्रेमाकडून पुस्तक वेडाकडे नेणारा उपक्रम: यशवंत बिब्लियोफाइल्स!

Chief Editor

विज्ञान आणि आरोग्य यांच्या समन्वयामुळे समाज सुदृढ बनू शकतो – डॉ. नितीन जोशी यांचे प्रतिपादन

Chief Editor

गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५० व्या शहिदी समारंभानिमित्त आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठामार्फत स्वयम प्लॅटफॉर्मद्वारे पीएच.डी. कोर्सवर्कवर एकदिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण

Chief Editor

राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष.

Chief Editor

Leave a Comment