एम सी आर
Uncategorized

विज्ञान आणि आरोग्य यांच्या समन्वयामुळे समाज सुदृढ बनू शकतो – डॉ. नितीन जोशी यांचे प्रतिपादन

नांदेड:

आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे व मोबाईलच्या अतिवापरामुळे समाजस्वास्थ्य बिघडत चालले आहे. व्यापारी, धोरणकर्ते इत्यादींच्या मतलबी व्यवहारामुळे समाजाचे आरोग्य उत्तरोत्तर धोक्यात येत आहे. सामाजिक, धार्मिक तथा समुदायवादी धोरणी उपक्रमात सामान्य माणूस गुंतून पडला जात आहे. करणी, भानामती इत्यादी बाधित व्यक्तींचे आयुष्य बुवा- बापूंच्या पायऱ्या झिजवण्यात खर्ची होत आहे. परिणामी सर्वसामान्य माणसांचे आजार अधिक गंभीर होत आहेत. या पार्श्वभूमीवर विज्ञान आणि आरोग्य यांचे समन्वय असणे अतिशय महत्त्वाचे आहे असे मत नांदेड येथील सुप्रसिद्ध पोटविकार तज्ज्ञ डॉ. नितीन जोशी यांनी व्यक्त केले.

यावर्षीच्या जागतिक आरोग्य दिन – २०२६ निमित्त “आरोग्यासाठी एकत्र: विज्ञानासोबत उभे रहा” (together for health – stand with science) या जागतिक आरोग्य संघटनेच्या संकल्पनेवर आधारित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे होते. तसेच प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, प्र. संचालक, डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांची उपस्थिती होती. सुमारे दीड तास चाललेल्या या व्याख्यानात आरोग्य आणि विज्ञान यावर सखोल चर्चा झाली. बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याची कळत नकळत कशी हानी होते, आजाराचे वेळेवर निदान नाही झाले तर गंभीर प्रसंगांना कसे सामोरे जावे लागते. याविषयी डॉ. नितीन जोशी यांनी पीपीटी द्वारे श्रोत्यांना समजावून सांगत होते. त्यांच्या निवेदनात सेवाभाव, विश्वास आणि तळमळ जाणवत होती.

विद्यापीठ तथा शैक्षणिक संस्थांमध्ये अशा आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन होणे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची उत्तम काळजी घेतली तर समाज आणि देशाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. परंपरेला विज्ञानाची जोड देऊन उन्नतीचे स्वप्न बाळगल्यास ते सहज साकार होत असतात. असे मत कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी अध्यक्षीय मनोगत मांडताना व्यक्त केला. तर डॉ. अशोक महाजन यांनी डॉ. नितीन जोशी यांच्या सेवाभाववृत्तीबद्दल कौतुक केले. आरोग्य, विज्ञान आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत माहिती सांगितल्याबद्दल डॉ. महाजन यांनी विद्यापीठाच्या वतीने डॉ. जोशी यांचे मनस्वी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पूज्य स्वामीजींच्या प्रतिमेला चंदनहार घालून अभिवादन! करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांनी केले तर भाषा संकुलातील विद्यार्थिनी विधि मुंदडा हिने सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय करून दिला. शास्त्रज्ञ डॉ. राजाराम माने, डॉ. राजपालसिंह चिखलीकर, इंजि. तानाजी हुस्सेकर, इंजि. अरुण धाकडे, श्री प्रकाश निहलानी, डॉ. मारुती गायकवाड, श्री शिवाजी चांदणे यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

————————————–

Share

Related posts

बदलत्या जीवनशैलीत योग्य आहाराचे महत्त्व – मीरा धुळगुंडे”

Chief Editor

घरफोडी प्रकरणातील आरोपी १२ तासांत जेरबंद; १९.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Chief Editor

थायरॉइड नियंत्रणासाठी नैसर्गिक उपाय | फिटनेस स्टुडिओकडून हमखास मार्गदर्शन: मीरा धुळगुंडे आरोग्य सल्लागार

Chief Editor

बंजारा समाज जोडो यात्रा नांदेडमध्ये दाखल

Chief Editor

विद्यार्थ्यांमध्ये क्षमताधिष्ठित कौशल्य विकसित करत रोजगाराची संधी देणारे अभ्यासक्रम अभ्यास मंडळानी तयार करणे काळाची गरज. – डॉ.डी.एन.मोरे.

Chief Editor

श्रद्धेय कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांना ‘यशवंत ‘ मध्ये विनम्र अभिवादन

Chief Editor

Leave a Comment