एम सी आर

नांदेड: शहरातील डी मार्ट रस्त्यावर तिहेरी हत्याकांड; गँगवॉरनंतर रुग्णालयातही खून

Uncategorized

नांदेड: नांदेड शहरात शुक्रवारी उत्तररात्री घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. डी-मार्ट परिसरात दोन गँग समोरासमोर आल्याने उडालेल्या चकमकीत दोघेजण जागीच ठार झाले, तर त्यानंतर खुनाचा बदला घेत शासकीय रुग्णालयात आणखी एकाचा भोसकून खून करण्यात आला. या घटनेतील एक मृत व्यक्ती नुकत्याच पार पडलेल्या नांदेड महापालिका निवडणुकीतील उमेदवार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदा गँग व साई लाला गँग यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अर्जित सिंग उर्फ अजय सिंग आणि शहाबाज यांच्यातही वाद झाले होते. शुक्रवारी रात्री अर्जित सिंग आपल्या मित्रांसह सिनेमा पाहून परतत असताना शहाबाज व त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना गाठले. यावेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार हल्ला झाला. या हल्ल्यात अर्जित सिंग व शहाबाज हे दोघेही जागीच ठार झाले.

जखमींना तातडीने विष्णुपुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे अर्जितच्या भावाने सूडभावनेतून हल्ला करत अरबाज याचा भोसकून खून केला. शासकीय रुग्णालयाच्या अपघात विभागातच झालेल्या या हत्येमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनास्थळावरून पोलिसांनी तीन दुचाकी, खंजर आदी साहित्य जप्त केले आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भाग्यनगर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हा शाखा, फॉरेन्सिक व श्वान पथकही तपासासाठी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Share

Related posts

आदर्श उपक्रम: सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा** *विविध ठिकाणी वृक्षारोपण; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप

Chief Editor

मौजे दरेगाव येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी…

Chief Editor

विकसित भारत २०४७ : आत्मनिर्भरतेतून महासत्तेकडे वाटचाल शक्य” – प्रा. डॉ. सुभाष पाटील

Chief Editor

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात करियर कट्टा इंडक्शन अवेअरनेस प्रोग्राम संपन्न 9

Chief Editor

महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यापीठाची महत्त्वाची सूचना

Chief Editor

डेरला गावातील शेतकरी गजानन काळे यांच्या चार एकर वरील ऊस जळून खाक,लाखो रूपयांचे नुकसान..

Chief Editor

Leave a Comment