https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
जाहीरात

राजकारणा पलीकडील समाजकारनी नेता महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे

राजकारण आणि राजकारणी म्हंटल तर समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच, बहुतांशी लोकांना राजकारण म्हणजे गलिच्छ आणि ते दुराचारी, भ्रष्ट, स्वार्थी, गुंड्या बदमाश लोकांचे काम असे वाटते. समाजातील प्रत्येकाला राजकारणात एक बदल हवा पण या बदलावाचा भाग कोणी होऊ पाहत नाही. ‘जिजाऊ- शिवाजी जन्मास यावे पण शेजारच्याच्या घरी’ अशी आजच्या समाजाची परिस्थिती झाली आहे.  अश्या परिस्थितीत फक्त गडचिरोली जिल्ह्यातच नाही तर किमान महाराष्ट्रात म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही, अशी राजकारणाला नवी दिशा दाखवण्याचे काम करत आहे, गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे युवा तडफदार अध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे.

  भाऊंची आणि माझी ओळखी फार काही जुनी नाही, भाऊंकडे जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे नोव्हेंबर-2021 मध्ये आली, तेव्हापासूनची आमची ओळखी आणि आतापर्यंत चा हा प्रवास.

  त्यापूर्वी भाऊ युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असतांना कोविड च्या काळात केलेले कार्य खरोखर उल्लेखनीय व प्रसंसनीय होते. जिल्ह्यातील सर्व सत्ता सूत्रे हातात असणारे आमदार- खासदार लोकप्रतिनिधी जे कार्य करू शकले नाही त्या पेक्षा चांगले कार्य कोविड काळात या तरुण राजकारण्यांनी करू दाखवले. स्वतः च्या जिवाची पर्वा न करता आपल्या इच्छाशक्ती च्या जोरावर महेंद्रभाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोविड रुग्णालयात केलेले मोफत भोजदान हे खरोखर वाखाण्याजोगे  होते. त्याचा एक लाभार्थी म्हणजे मी आणि माझ्यासारखे फक्त गडचिरोली जिल्ह्यातील नव्हे तर इतरही जिल्ह्यातून आलेले अनेक कोविड रुग्ण व त्यांचे नातेवाईक होते.  इतकेच नाही तर भाऊ जिल्हाध्यक्ष झाल्यापासून मार्कण्डा यात्रे करिता मोफत बससेवा असेल, आता आलेल्या महाभयंकर पुररिस्थीत पूरग्रस्तांना मदतीसाठी मोफत अन्नधान्य किट व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वितरण असेल किंवा मग आरोग्याच्या संदर्भाने मदतीसाठी अर्ध्या रात्री गरजूंचे आलेले फोन कॉल असो सर्वांच्या मनाला समाधान वाटेल असेच कार्य महेंद्रभाऊ कडून होतांना मला दिसले. ह्यातूनच मला त्यांच्यातील राजकारणातून समाजकारण साधणारे खरे राजकारणी दिसून येतो. त्याचप्रमाणे जिल्हयातील एकमेव असलेला हत्ती चे स्थलांतर रोखण्यासाठी केलेले आंदोलन, वेळोवेळी शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसंन्याच्या हितासाठी भाऊंच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्यातील खरा कर्तव्याची जाण असणारा नेता दिसून येतो.

इतकेच नाही तर पक्ष वाढीसाठी चालणारी त्यांची धडपड ही सुद्धा उल्लेखनीय आहे, काँग्रेसची डिजिटल सभासद नोंदणी, नवसंकल्प कार्यशाळा सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून लहानातला लहान कार्यकर्ता असेल तरी सर्वांना सोबत घेऊन चालणे. 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कुरखेडा ते गडचिरोली अशी 75 km ची आझादी गौरव पदयात्रा भर पावसातही भिजत त्यांनी यशस्वी करून दाखवली. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसा पर्यन्त 75 हुन अधिक किलोमीटर चा प्रवास झालेला असतांना पक्ष वाढीसाठी करत असलेल्या कार्याचा तेज भाऊंच्या चेहऱ्यावर झळकत होता. हाच तेच हीच जिद्द पक्षवाढीसाठी व समाज उत्थानाच्या कार्यासाठी भाऊंमध्ये सतत रहावी व त्यामाध्यमातून राजकारणाला व इतरही राजकारण्यांना नवी दिशा मिळावी ह्याच शुभेच्छेसह आमचे मार्गदर्शक गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे युवा तडफदार अध्यक्ष महेंद्र भाऊंना वाढदिवसाच्या व दीर्घायुष्याच्या अनेक अनेक शुभेच्छा!!

Happy Birthday Bhau!!

अनुप कोहळे

1 सप्टेंबर 2022

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704