महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय नांदेड येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

नांदेड दि:महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय, नांदेड* *अंतर्गत ललित कला भवन, नांदेड येथे गटस्तरीय समरगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. कैलास यादव ( स्वा. रा. ती. म. विद्यापीठ नांदेड) प्रमुख पाहुणे श्री. उमेश थळंगे उपकार्यकारी अभियंता महापारेषन, जगमवाडी नांदेड तर प्रमुख उपस्थिती प्रा. प्रितम लोणेकर, मा. श्री गुणवंत मिसलवाड ( गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त) व कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस सर कार्यक्रमास उपस्थित होते.*कार्यक्रमाचे परीक्षक मा. श्री.संतोषसिह चौधरी, मा. श्री. गंगाधर चिते, मेघा गायकवाड (जोंधळे) यांनी या कार्यक्रमाचे परीक्षण केले. *या कार्यक्रमात समरगीत-स्फूर्तीगीत विविध रंगी सादर करण्यात आले. या स्पर्धेत 9 संघांनी सहभाग नोंदविला. सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संघ विजेते ललित कला भवन, नांदेड ठरले तर द्वितीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र चोफळा व तृतीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र, सिडको नांदेड यांनी पटकवला. या विजेत्या संघास अनुक्रमे रु. 5000/- 3000/- 2000/- व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच या प्रसंगी उपस्थित सर्व पाहुण्याचे गुलाबपुस्प देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी बोलताना प्रा. डॉ. यादव सर यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या या सांस्कृतिक कार्यक्रमा बदल कोतूक केले व मंडळाच्या योजना व उपक्रमाचे कौतूक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच प्रा. प्रितम लोणेकर यांनी हि आपले मत मांडून मंडळास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस यांनी केले तर सूत्रसंचालन विलास मेंडके केंद्र संचालक ललित कला भवन, नांदेड यांनी केले तर आभार विश्वनाथ साखरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेषराव फाळके, गजानन भोसीकर, प्रसाद शेळके, नागेश कल्याणकर, साईनाथ राठोड, मंदा कोकरे, अर्चना शिवनखेडकर, चंद्रकांत अबोरे, अरुणा गिरी, नामदेव तायडे, उषा गवई व वैजेनाथ स्वामी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.*