ताज्या घडामोडी

वृक्ष संवर्धन व पर्यावरण रक्षण एक आवश्यक पाऊल..

प्रतिनिधी:
वृक्ष संवर्धन म्हणजे वृक्षाचे संरक्षण आणि संवर्धनाची प्रक्रिया वृक्ष आपल्या पर्यावरणाचे महत्त्वाचा घटक आहे. वृक्ष शिवाय आपण जगू शकत नाहीत. वृक्षाष आपण थोडीशी जमीन व पाणी देतो पण वृक्ष आपणास जीवनभर साथ देत राहतात. भारतीय संस्कृतीत विविध वृक्षांना आपण फुलांना पानांना किंवा फळांना विविध स्थितीत पवित्र मानले आहे. भारतीय संस्कृती ही वृक्ष पूजकाने निसर्ग पुजक आहे .आपल्या तुकाराम महाराजांनी आपणास

वृशवली आम्हा सोयरे वनचरे

पक्षी ही सुरवरी अळविता

येणे सुखी रुची एकांताचा वास नाही गुण दोष अंग आहेत
आकाश मंडप पृथ्वी आसन
रमे येथे मन क्रीडा करी

वृक्ष आपली सोयरे आहेत ही महाराजांची धारणा आहे. वनातील पशुपक्षी ही पांडुरंगाची नाम स्मरण करतात. आपले व वनाचे तर नातच आहे. वनाच्या जडणघडणीच्या अस्तित्वात मानवी हस्तक्षेपाचा प्रथम पासून सतत परिणाम करीत आहे. आदिमानव शिकारी करून जीवन जगत असेल वनाचा उपयोग पशु व पक्षी यांचे शिकारी खेरीज लाकडापासून अग्नी व उब झाडांच्या साली पासून वल्कले कंदमुळे यासाठी केला. त्यानंतर शेतीप्रधान जीवनपद्धती वनक्षेत्र साफ करून धान्याची लागवड करणे व शेतीच्या अवजारासाठी लाकडी तोडणे वस्तीसाठी वने रिकामी केले गेले त्यामुळे जमिनी धसत गेली. आज वृक्षतोड भरपूर प्रमाणात झाल्यामुळे तापमानात वाढ झालेली आहे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.याचा वातावरणावर परिणाम झालेला आहे. हवेत प्रदूषणाची वाढ होतच आहे वृक्ष संवर्धनाचे महत्त्व समजून घेणे व पर्यावरण पर्यावरणाचा लाभ पाहणे आवश्यक आहे.

१) हवा शुद्धीकरण :- वृक्ष कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात ऑक्सिजन सोडतात त्यामुळे हवा शुद्ध होत

२) जलसंधारण :- वृक्षामुळे जमिनीत पाणी साठवले जाते

३) प्राणी संरक्षण :- वृक्ष विविध पक्षी कीटक आणि वन्य पाहण्यासाठी आधार स्थान आणि अन्नदानाचे स्त्रोत आहे

४) तापमापन यंत्र :- वृक्षाची छाया वातावरणातील तापमानाला कमी करते

५) मातीचे संरक्षण :- वृक्षामुळे मातीचे विघटन होण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे वृक्ष संवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. वृक्षारोपण करणे शाळेतून ग्रामपंचायत शासकीय व इतर सामाजिक ठिकाणीवृक्षारोपण करणे आवश्यक आहे
वृक्षाची काळजी घेणे गरजेचे आहे त्यांना पाणी व खत घालने आवश्यक
आहे

लोक जागरूकता लोकांना वृक्षाचे महत्त्व समजून सांगणे वृक्षारोपणात सहभागी करून घेणे यासाठी लोकांना
प्रेरित करणे आवश्यक आहे
संवर्धन हे केवळ पर्यावरणाची गरज नाही तर आपले भविष्यासाठीही अत्यंत आवश्यक आहे. पक्षाचे संरक्षण करणे म्हणजेच आपल्या भविष्यातील जीवनाची गुणवत्ता व स्थितीची काळजी घेणे होय‌.

अशोक आनंदराव पुपलवाड
जिल्हा परिषद प्रशाला
केंद्रप्रमुख सिंदखेड तालुका माहूर जिल्हा नांदेड

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.