ताज्या घडामोडी

स्वामुक्टा प्राध्यापक संघटनेचा नांदेड जिल्हा मेळावा संपन्न

नांदेड – (डॉ प्रवीणकुमार सेलूकर)
आज रोजी एम. फुकटो संलग्नित रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व कॉलेज टीचर्स असोसिएशन (स्वामुक्टा) नांदेड संघटनेचा प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्याबाबत आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी नांदेड जिल्हा मेळावा सायन्स कॉलेज नांदेड येथे संपल झाला. केंद्र व राज्य सरकारकडे प्राध्यापकांच्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यामध्ये ज्या काही प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्या आहेत. त्यामध्ये सरकारने 18 जुलै 2018 च्या परिपत्रकानुसार अमलबजावणी करावी, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापकाना पदोन्नतीचे लाभ पात्रता दिवसापासून प्राप्त व्हावेत, एम. फिलधारक प्राध्यापकांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढावेत, जुनी पेन्शन योजना चालू करावी, पूर्णवेष्ठ प्राध्यापकांची त्वरित भरती करावी. महाविद्यालयातील प्राध्यापकाची पीएच.डी मार्गदर्शक म्हणून मान्यता कायम ठेवावी. अनुज्ञेय असलेल्या रजा लागू करण्यात याव्यात, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 चे एकरूप परिनियम लागू करण्यात याण्यात यावा. सहसंचालक कार्यालयातील भ्रष्टाचारावर नियंत्रण घालण्यात यावे.
अशा विविध प्रलंबित मागण्याच्या संदर्भात हा जिल्हा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून नांदेड जिल्हा स्वामुकटा अध्यक्ष डॉ. गौतम दूधडे, प्रमुख उपस्थितीत संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. सूर्यकोत जोगदंड, उपाध्यक्ष, डॉ. डी. एन. मोरे, सचिव डॉ.विजय भेपाळे, कोषाध्यक्ष डॉ दिलीप पाईकराव, महिला प्रतिनिधी डॉ करुणा पतंगे, सायन्स महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व विद्यापीठ अकॅडमिक आधिसभा सदस्य डॉ. एल. पी शिंदे, नांदेड जिल्हा सचिव डॉ. रामचंद्र भिसे यांची उपस्थिती होती. मेळाव्या बाबतची भूमिका आणि प्रलंबित मागण्याबाबत प्राध्यापकांनी करावयाचे आंदोलन याबाबत स्वामुक्ता संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. यावेळी नांदेड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे स्वामुक्ता स्थनिक शाखेचे पदाधिकारी व स्वामुकटा चे सदस्य प्राध्यापकांची लक्षनीय उपस्थिती होती. या मेळाव्याचे सूत्रसंचालन डॉ. रामचंद्र भिसे डॉ. तुकाराम बोकारे यांनी केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.