ताज्या घडामोडी

डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन, प्र. कुलगुरु, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश आढावा बैठक संपन्

नांदेड: (डॉ प्रवीणकुमार सेलूकर)
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक विभागीय केंद्र, नांदेड अंतर्गत (परभणी, हिंगोली, नांदेड, लातुर) चार जिल्हयांचा समावेश असुन शैक्षणिक वर्ष 2024-25 ऑनलाईन प्रवेश प्रकीया 01 जून 2024 पासुन सुरु झाली आहे. विभागीय केंद्राकडून गुरुवार दिनांक 25 जूलै 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता कुसुन सभागृह, व्ही. आय.पी. रोड नांदेड या ठिकाणी प्रत्यक्ष प्रवेश आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर प्रवेश बैठकीसाठी विद्यापीठाचे मा. प्र. कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन सर यांनी अध्यक्षस्थान भूषविले असून विद्यापीठाच्या ध्येय व धोरणानुसार तसेच विद्यापीठाच्या ब्रीद वाक्य ज्ञानगंगा घरोघरी पोहचवावी व उच्च शिक्षणापासुन विद्यार्थी वंचीत राहू नये तसेच जगातले अग्रगण्य डीजीटल विद्यापीठ असून कौशल्य पुर्ण विकास विद्यार्थ्यांचा व्हावा व विद्यार्थी घडावा याचाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. प्रकाश देशमुख मा. संचालक विद्यार्थी सेवा विभाग, श्री. मनोज घंटे उपकुलसचिव नोंदणी विभाग आणि डॉ. दयानंद हत्तीअंभीर, शैक्षणिक संयोजक अभ्यासकेंद्र प्रतिनीधींना प्रवेशा संदर्भात तसेच विद्यापीठाची गुणवत्ता व गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी मार्गदर्शन केले.सदर बैठकीत पिपल्स महाविद्यालय, नांदेड, प्राचार्य, डॉ. आर. एम. जाधव, योगानंद महाविद्यालय, वसमत प्राचार्य, डॉ. नागनाथ पाटील, शहीद भगतसिंग महाविद्यालय, किल्लारी चे प्राचार्य, डॉ. संग्राम मोरे, नितीन कला व वाणीज्य महाविद्यालय, पाथरी चे प्राचार्य, डॉ. आर.एस फुन्ने व मोठ्या प्रमाणात प्राचार्य व केंद्रसंयोजक उपस्थित होते.
सदर बैठकीकरीता डॉ. कलेपवार यशवंत धर्माजी, वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार,, विभागीय केंद्र, नांदेड यांनी चार जिल्हयांतील समाविष्ठ असलेल्या सर्व अभ्यासकेंद्र केंद्रप्रमुख / केंद्रसंयोजक प्रतिनीधींना प्रवेश वाढीसंदर्भातप्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवरांचे व अभ्यासकेंद्र प्राचार्य व केंद्रसंयोजक यांचे आभार डॉ. शिंदे गणेश गंगाधर यांनी मानले. सदर कार्यक्रमाचे संचलन प्रा. डॉ. शंकर विभुते इंदिरा गांधी महाविद्यालय, सिडको यांनी, केले. सदर बैठक यशस्वी पार पाडण्याकरीता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक विभागीय केंद्र, नांदेड येथील श्री. शेखर जगताप, सहायक, व श्री. दिलीप थोरात, सहायक व विभागीय केंद्रातील सर्व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.