ताज्या घडामोडी

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय आणि टेक्स्टाईल गारटेक्स्टाईल गारमेंट कौशल्य विकास कोर्सच्या माध्यमातून रोजगार निर्मितीच्या अनेक संधी- बालासाहेब पांडे.

नांदेड: प्रतिनिधी mcrnews

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय आणि टेक्स्टाईल गारमेंट असोसिएशन मराठवाडा युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहा दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा समारोप 30 जुलै 2024 रोजी नेसुबो महाविद्यालय येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पांडे यांची उपस्थिति होती. प्रमुख वक्ता म्हणून डॉ.रवींद्र जोशी गुरू गोविंद सिंह अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड़, तसेच प्रमुख उपस्थिति मध्ये डॉ. पी.ए. खुडे, महिला महाविद्यालयाच्या प्रा. अंजली दूधमांडे, मातोश्री सेवाभावी संस्थेच्या संचालिका सौ. चंदेल, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.महेंद्र कुलकर्णी आणि उपप्राचार्या डॉ. कल्पना कदम उपस्थित होते. सदरील टेक्सटाईल अँड गारमेंट निर्मिती कौशल्य विकास प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या समन्वयिका म्हणून डॉ. ललिता यडपलवार आणि डॉ. रवींद्र जोशी SGGS समन्वय आणि श्री ए. जी. संगनवार जीवन साधना संस्था नांदेड, श्री एम आर जाधव नेरली कुष्ठधाम, संचालक यांनी मोलाची जबाबदारी पार पाडली या प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना टेक्स्टाईल गारमेंट निर्मितीच्या संबंधित मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिक टेक्सटाईल गारमेंट निर्मिती मराठवाडा युनिटला भेट देण्यात आली तसेच नेरली कुष्ठधाम चे संचालक श्री एम आर जाधव यांच्यामार्फत पुष्पगुच्छ बनवण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले श्रीसंगणवार सरांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या आकर्षक डिझाईन्स तयार करण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी शिकून जे वेगवेगळे डिझाईन आणि पुष्पगुच्छ तयार केले त्याचे प्रदर्शन भरविण्यात आले .यात अमृता ठाकूर प्रथम आणि कुमारी राजेश्वरी परदेशी द्वितीय असे उत्कृष्ट डिझाइन्स आणि बुके तयार केलेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सौ ज्योती शिंगारे, अमृता ठाकूर, सौ. सत्यवती ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. या अभ्यासक्रमासाठी 27 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती डॉ. रवींद्र जोशी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शिक्षणासोबत आपल्याकडे एखादे कौशल्य असणे आवश्यक आहे जेणेकरून आपण स्वतः रोजगार देणारे होऊ शकतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विविध प्रकारचे कोर्सेस विद्यार्थ्यांना रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देतात असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. बालासाहेब पांडे यांनी हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देणार आहे असे गौरवउद्गार काढले. जीवन साधना संस्थेचे श्री संगणवार यांनी विद्यार्थ्यांना स्वतः आपला व्यवसाय कशा पद्धतीने सुरू करता येतो या संदर्भात सखोल माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयिका डॉ. ललिता यडपलवार व आभार प्रा. सारिका लहानकर यांनी केले. कार्यक्रमास डॉ. शिवदत्त विभुते वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. अतिश राठोड, प्रा. किरण वाघमारे, प्रा. माधवी पांडे, डॉ. निरंजना माचेवार, सौ मेघा कांबळे डॉ. अर्चना भवानकर, डॉ. क्षमा करजगांवकर, डॉ. आनंद अष्टुरकर, डॉ.भालचंद्र धर्माधिकारी, प्रा. अश्विनी खांडेकर, डॉ. राजेश उंबरकर, डॉ. गजानन रत्नपारखे तसेच मयूर जोशी ,शिवराज सोनटक्के सुनंदा जवळेकर, भाग्यश्री गंगाधरे, अनिल देशपांडे यांची उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.