ताज्या घडामोडी

गुरु रविदास यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात प्रगती करावी. :युवा जिल्हाध्यक्ष विठ्ठल वाघमारे*

मानवत / प्रतिनिधी.

सहाशे वर्षांपूर्वी गुरु रविदास जी महाराज यांनी संघर्ष करून पंजाबी भाषेची निर्मिती केली आणि तमाम बहुजन समाजाला शिक्षणाचे दार खुले केले त्यांचा आदर्श सर्व संत महापुरुष महामानवाने घेऊन त्यांचे विचारधारा समोर वाढविले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश त्यांनी दिला त्यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात प्रगती करावी असे प्रतिपादन राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा नांदेड चे युवा जिल्हाध्यक्ष विठ्ठल वाघमारे यांनी
राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा नांदेड व मैत्री युवा प्रतिष्ठान नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शिवपार्वती मंगल कार्यालय येथे संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये आपले विचार व्यक्त केले, या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार वसंतराव चव्हाण यांनी केले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक मोटर वाहन निरीक्षक नांदेड शिवहरी गायकवाड हे होते, या कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक स्वामी विवेकानंद अकॅडमी परभणीचे संचालक प्रा.विठ्ठल कांगणे सर तसेच माझी खासदार सुभाषराव वानखेडे आमदार बालाजी कल्याणकर ,विदर्भ प्रमुख संभा वाघमारे, मधु गिरगावकर, राज्य उपाध्यक्ष नरहरी सोनवणे,हिंगोली जिल्हाध्यक्ष डॉ. प्रल्हाद वाघमारे, यांचे प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये विशेष सत्कार UPSC उत्तीर्ण झालेले अजय बाबाराव इटकरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला तसेच समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल समाजरत्न पुरस्कार माधवराव निंबाळकर व नागोराव सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला प्रा. विठ्ठल कांगणे सरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, या कार्यक्रमांमध्ये 150 गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला व विविध विभागामध्ये नोकरीवर लागलेल्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी समाज बांधव हजारो च्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी , राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवरावजी गायकवाड, राज्य सचिव संजय सोनटक्के, महानगराध्यक्ष इंजि. दिगंबर भाडेकर,संघटक गोविंद माऊली पार्डीकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे, नांदेड शहर प्रमुख संदीप गोरे, इंजि. विशाल बनसोडे, युवा जिल्हाध्यक्ष विठ्ठल वाघमारे, युवती जिल्हाध्यक्ष ज्योती सोनटक्के, दक्षिण जिल्हा कार्याध्यक्ष व्यंकटराव कांबळे, केरबा कसारे, कार्याध्यक्ष के.के. गंगासागरे, महासचिव रमेशचंद्र हराळे, महासचिव सुनील माहुरे, दक्षिण जिल्हा सचिव सुरेश शेळके, युवा शहराध्यक्ष भरत अन्नपूर्णे, मुखेड तालुका युवा अध्यक्ष रविराज गंगासागरे, युवा शहर उपाध्यक्ष सचिन दुधंबे युवा शहर उपाध्यक्ष संतोष आडेराव, युवा शहर कार्याध्यक्ष बालाजी आडेराव, युवा शहर कोषाध्यक्ष सुरेश सोनटक्के, युवा शहर सचिव विष्णू आडेराव, युवा सचिव सुनील सोनटक्के, युवा सहसचिव अभिजीत उत्तकर, युवा प्रसिद्धी प्रमुख गणेश सोनटक्के, मुदखेड तालुका युवा अध्यक्ष सुभाष दुधंबे, मुदखेड तालुका युवा उपाध्यक्ष हरीश कांबळे, अर्धापूर तालुकाध्यक्ष बालाजी गंगासागरे,प्रकाश वानखेडे, तुळशीराम वाघमारे, शेषराव आसोरे, इत्यादींनी परिश्रम घेतले

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.