राष्ट्रीय महामार्गाकडे मा. खा. नितीनजी गडकरी यांनी लक्ष देण्याची गरज
मानवतरोड उडानपुलावरील खड्याची श्रमदानातून यूवकांनी केली डागडूजी

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालूक्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाकडे अभियंत्याचे दूर्लक्ष होत असून महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या समस्येकडे मा. नितीनजी गडकरी साहेबांनी लक्ष द्यावे अशी मागणी यूवा वर्गातून होत आहे.
तालुक्यातील राष्ट्रीय महा मार्गावरील मानवतरोड येथील उडान पुलावरील खड्डे रस्ते विकास अभियंत्यांना दिसत नसल्यामूळे हे खड्डे अपघाताचे कारण बनले होते मानवत येथील काही युवकांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने व श्रमदान करून खड्डे बुजवून राष्ट्रीय महामार्गाची डागडूजी करून रस्ता सुरळीत केला या मध्ये *मावनत येथील खंडेराय राऊत, संदिप टेकाळे, अरूण देशमुख, माऊली करडले, गोविंद मोरे* या यूवकांनी सामाजीक बांधिलकी जपून रस्त्याची डागडूजी केली. युवकांच्या सामाजीक कार्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
पण राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक खड्डे हे माहामार्ग अभियंत्यांना कसे काय दिसत नाही, असा प्रश्न सामान्य जनतेला पडला असून राष्ट्रीय महामार्गाचे *पितामहा मा. खा. नितिनजी गडकरी* यांनी परभणी जिल्हातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत यूवा वर्गातून व्यक्त केल्या जात आहे.
***