ताज्या घडामोडी

मल्हारराव कांबळे यांचे निधन

नांदेड, (प्रतिनिधी)-त्रिरत्न नगर सांगवी परिसरातील ज्येष्ठ नागरिक मल्हारराव केरबाजी कांबळे यांचे आज दुपारी दिनांक २० जून रोजी दुपारी १.३० च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. उमरखेड तालुक्यातील पोफाळी साखर कारखाना येथून कृषी सहायक म्हणून ते सेवानिवृत्त होते. दिवंगत मल्हारराव कांबळे यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक २१ जून २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता नांदेडच्या गोवर्धन घाट शांतीधाम स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात चार भाऊ, पत्नी, तीन मुली, एक मुलगा, नातू, जावई असा परिवार आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे जवान सुमेध कांबळे यांचे ते वडील होत.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.