ताज्या घडामोडी

प्राध्यापकांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यास उच्च शिक्षण संचालकांकडे नाही वेळ

नांदेड: (दि. 21 जून )
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या व्यवस्थापन परिषेदच्या बैठकीच्या निमित्ताने राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे विद्यापीठात आले असता त्यांना महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ संलग्नित ‘स्वामुक्टा’ प्राध्यापक संघटनेच्या वतीने अकृषी विद्यापीठे व सलंग्नित अशासकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या शासन स्तरावरील विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करणेबाबतचे निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता संचालकांनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिला.
याउलट एका व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यास व्यक्तिगत प्रश्नासाठी चर्चा करण्यास संचालक वेळ देतात; मात्र सामान्य प्राध्यापकांच्या प्रश्नावर संघटनेच्या माध्यामातून विविध जिल्ह्यातून निवेदन देण्यासाठी विद्यापीठात आलेल्या प्राध्यापकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. संचालकांच्या या कृतीमुळे प्राध्यापकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकशाहीत देशातील प्रत्येक नागरिकास सनदशीर मार्गाने आपले प्रश्न लोकसेवकाकडे मांडण्याचा मुलभूत हक्क संविधानाने दिलेला असून शासनाचे अधिकारी मात्र मनमानी पद्धतिने सामान्यांना वागणूक देतात त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.
‘स्वामुक्टा’ प्राध्यापक संघटनेच्या वतीने संचालकांच्या या कृतीचे संघटनेला आश्चर्य वाटते, आगामी काळात महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या नेतृत्वात संचालक कार्यालय पुणे येथे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती ‘स्वामुक्टा’ प्राध्यापक संघटनेचे सचिव डॉ. विजय भोपाळे यांनी दिली आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.