ताज्या घडामोडी

मानवत नगर परिषदेच्या परिक्षेत्रातील जूने धोकादायक बांधकामे पाडून घ्या !:श्रीमती, कोमल सावरे.(मुख्याधिकारी )

*

मानवत / प्रतिनिधी.

मानवत नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात अतिशय जूने बांधकामे रस्त्याच्याकडेवर आहेत तर अनेक बांधकामे गल्ली बोळात आहेत शहरातील अनेक बांधकामे धोकादायक व अतिधोका दायक जूने बांध कामे आहेत. पावसाळ्यात अनूचित प्रकार घडू नये म्हणून नागरिकांनी आपली अशी धोकादायक बांधकामे पाडून घेण्याचे मानवत नगर परिषदेचे मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी मानवत शहरातील सुज्ञ नागरीकांना आवाहन केले आहे.

सविस्तर वृत्त असे की,
महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगीक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १९५ अन्वये मानवत नगर परिषद हद्दितील सर्व रहिवाशी मिळकत धारक यांना एका नगर परिषदेच्या जाहीर सुचनेद्वारे कळविण्यात येते की, चालू पावसाळी मौसमा मध्ये संभाव्य अतिवृष्टी, वादळ इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी जिवित व वित्त हाणी टाळण्यासाठी ज्या मिळकती, इमारती धोका दायक झाल्या आहेत अथवा त्याचा काही भाग धोका दायक झाला आहे, अशा इमारती मध्ये किंवा मिळकती मध्ये कोणी ही वास्तव्य करू नये, तसेच अशा इमारतीं च्या व मिळकतीं च्या संबंधीत मालकांनी / भोगवटा धारकांनी आपल्या कुटूंबीयांची तसेच शेजार च्या रहिवाशांची संभाव्य जिवित व वित्त हाणी होवु नये, या दृष्टीने धोका दायक इमारतीचा धोकादायक भाग तातडीने उतरवुन घेवुन धोका नष्ट करावा. या बाबत अशा धोकादायक इमारती महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगीक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १९५ अन्वये सर्व संबंधितांना यापुर्वी कळविण्यत आले होते. तथापि, आप आपसातील वाद व इतर कारणामुळे अनेक मिळकत धारकांनी अशा धोका दायक इमारती बांधकामे काढुन घेतलेली नसल्याचे निदर्शनास येत आहे.
सदरची हि बाब अयोग्य व धोकादायक असुन, अशी धोकादायक बांधकामे पडुन हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधितांनी अशा धोकादायक इमारती / बांधकामे तात्काळ रिकामी करून अशी बांधकामे तात्काळ पाडुन / उतरवुन घ्यावीत, अन्यथा अशा धोकादायक इमारती मध्ये जर कोणी वास्तव्य केले तसेच त्यामुळे आपणास व इतरांस कोणत्या ही प्रकार ची जिवित व वित्तहाणी झाल्यास त्यास संबंधीत घर मालक /भोगवटादार हे संपूर्णतः जबाबदार राहिल. यास मानवत नगर परिषद प्रशासन जबाबदार राहणार नाही. याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन मानवत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती कोमल सावरे यांनी केले आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.